विवाहित असूनही कोणालाही ‘किस’ करायला अजिबात लाजत नाही करीना.. म्हणे सैफनेच दिली आहे परवानगी..

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर नेहमी आपल्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. तिन सैफ अली खानसोबतच्या रिलेशनशीपबद्दल बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. एका मुलाखतीत तिला विचारले होते की, सैफसोबत लग्न केल्यानंतर त्यांनी ऑन स्क्रीन पॉलिसी ठरवली नाही का कारण सैफ लग्नानंतर काही सिनेमात इतर अभिनेत्रींसोबत किसिंग सीन करताना दिसला होता.

करीना कपूरने या प्रश्नांचे उत्तर बेधडकपणे देताना सांगितले होते की, आम्ही ऑफस्क्रीन नो किसिंग पॉलिसी स्वीकारली आहे. सैफ ऑन स्क्रीन कोणालाही किस करू दे, मला काहीच प्रॉब्लेम नाही कारण ज्यापद्धतीने चित्रपट बनत आहेत, ते आमच्या कामाचा हिस्सा आहे.

करीनाने पुढे याबद्दल सांगितले की, मी की अँड कामध्ये अर्जुन कपूरसोबत किसिंग सीन दिले होते कारण हा चित्रपट पती पत्नीच्या नात्यावर होता आणि मी किसिंग सीन करायला नकार देणे योग्य ठरले नसते. करीना म्हणाली की, लग्नानंतर मी आणि सैफ सिनेमात नो किसिंग पॉलिसीचा अवलंब करणार होतो पण साराने आमचा विचार बदलायला लावला.

सारा अली खानने करीना आणि सैफला म्हटले होते की, अशी पॉलिसी फॉलो करणे व्यर्थ निर्णय ठरेल कारण हल्ली प्रेक्षक याबद्दल इतका विचार करत नाही. तुम्ही दोघे किसिंग सीन्सला घेऊन नॉर्मल रहा काही होणार नाही. आम्हाला साराची गोष्ट आवडली आणि आम्ही ती फॉलो केली.

सैफ आणि करीनाने २०१२ साली साध्या पद्धतीने रजिस्टर्ड मॅरिज केले होते. सैफचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने अमृता सिंगसोबत लग्न केले होते जे फक्त १३ वर्ष टिकले. २००३ मध्ये दोघे वेगळे झाले. घटस्फोटोनंतर अमृता सिंगला सारा अली खान आणि इब्राहिमची कस्टडी मिळाली.

वडील सैफ अली खानसोबत सारा अली खानचे खूप चांगले संबंध आहेत. दोघेही एका चांगल्या मित्रांसारखे एकमेकांसोबत असतात. याचा खुलासा स्वतः सैफ अली खान यांनी अनेकदा केला आहे. सैफ अली खानने एका मुलाखतीत सांगितले होते की सारा मला तिचा चांगला मित्र मानते आणि ती तिच्या सर्व गोष्टी माझ्याबरोबर शेअर करत असते

सैफने असेही सांगितले होते की आम्ही बर्‍याचदा एकत्र पब किंवा बारमध्ये एकत्र जातो तिथे दोघेही एका चांगल्या मित्रासारखे आम्ही एकत्र दा-रू पितो. आम्ही तुम्हाला सांगतो की नुकतीच सारा अली खान बर्‍याच चर्चेत आली होती, जेव्हा एनसीबीने तिला चौकशीसाठी बोलावले होते. यामुळे सोशल मीडियावर सारा अली खान वर भरपूर टीका झाली होती.

सैफच्या चारही मुलांमध्ये कायमच तुलना केली जाते. यामध्येच मला चारही मुले सारखीच आहेत, असे सैफने म्हटले आहे. मी त्यांच्यासाठी कायमच तयार आहे. मी माझ्या चारही मु-लांवर सारखेच प्रेम करतो. हे खरं आहे की मी तैमूरसोबत जास्त वेळ असतो.

Leave a Reply

Your email address will not be published.