सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह राहणारी आणि वादग्रस्त भाषणे देणारी कंगना राणावत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अलीकडेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक बोल्ड लुक मध्ये एक फोटो अपलोड केला आहे, तो पाहून काही चाहत्यांनी तिच्या लूकची खिल्ली उडवली तर काही चाहत्यांना तिचा हा हॉट लूक खूप आवडला.
अलीकडेच, कंगना राणौत तिच्या “धाकड” चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात गेली होती, तिथे तिने चित्रपटाची शूटिंग संपल्यामुळे एक रॅप-अप पार्टी आयोजित केली होती आणि त्या पार्टीत तिने बोल्ड ड्रेस परिधान केला होता, ज्यात तिचा एक हॉट लूक चाहत्यांना पाहायला मिळाला. ज्याला वापरकर्त्यांनी जबरदस्त प्रतिसाद दिला.
कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड केलेल्या चित्रामध्ये ती पांढरी ब्रलेट परिधान केलेली दिसत आहे आणि पांढऱ्या हाई वेस्ट पँटसह ती कॅरी केली आहे. कंगनाने अपलोड केलेल्या फोटोला कॅप्शन देताना लिहिले आहे की, “प्रेमामद्ये जगणे व मरने यात काहीच फरक नाही, त्या व्यक्तीला पाहून जगते, ज्याच्या काफिरमद्ये दम निघेल….
कंगना तिच्या “धाकड” चित्रपटाच्या शूटिंगसाठी परदेशात शूटिंग करत होती. कंगनाचा हा चित्रपट थ्रिलर कथेवर आधारित आहे. ज्याचे दिग्दर्शन रजनीश राजीव घई ने केले आहे, या चित्रपटासह कंगना थलाईवी, तेजस आणि मणिकर्णिका: रिटर्न्समध्येही दिसणार आहे.