बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री नीना गुप्ताप्रमाणेच तिची मुलगी आणि फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताची लोकप्रियता काही कमी नाहीये. तसेच, मसाबा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरीच चर्चेत राहिली आहे. मात्र, यावेळी ती तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. मसाबाने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम पेजवर स्वतःचा हा बोल्ड फोटो शेअर केला आहे. डिझायनर-सह-अभिनेत्रीने मंगळवारी ब्राऊन कलर आणि बेेज कलर चे स्कर्ट परिधान केले होते.
यात ती खूप सुंदर दिसत आहे. तसेच मसाबा तपकिरी कोऑर्डिनेटिंग ड्रेसमध्ये चमकत आहे. मसाबाने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी गोल्डन कलरच्या अॅक्सेसरीज घातल्या आहेत. मसाबा गुप्ता ने या फोटोशूट दरम्यान गोल्डन आणि ब्राऊन शेडचा मेकअप केला आहे.
मसाबाने चित्र पोस्ट केल्याच्या काही मिनिटांनंतरच ते सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. केवळ सामान्य लोकच नाही तर सेलिब्रिटीजही मसाबाच्या या लूकचे कौतुक करत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ‘उफ’ यासह तिने फायर इमोजी बनवल्या. त्याचवेळी मलायका ने ‘लव’ लिहिले… बॉलिवूड सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनैता श्रॉफ अदजानिया ने लिहिले, ‘उफ न्यूड इज यू!’ गुल पनाग यांनी टिप्पणी केली, मिनी माथूर ने लिहिले, ‘क्या? जाओ नही. ‘ काही काळापूर्वी मसाबाने तिचा फिटनेस जर्नी चाहत्यांसोबत शेअर केला होता. तसेच या फोटोशूटमध्ये मसाबा तिच्या टोन्ड बॉडीला फ्लॉन्ट करत आहे.