टायगरची बहिण कृष्णा श्रॉफला आता होतोय त्या कृत्याचा खुपचं पश्चाताप; म्हणाली, आता कधीच…

अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ नेहमीच तिच्या बोल्ड फोटो आणि लव्ह लाईफमुळे चर्चेत असते. भाऊ टायगर पर्सनल लाईफबद्दल बोलणं टाळतो. याऊलट कृष्णा अगदी बिनधास्त बोलते. बॉयफ्रेन्डसोबतचे रोमॅन्टिक, बोल्ड फोटो शेअर करते. कृष्णा व तिचा एक्स बॉयफ्रेन्ड इबन हायम्स यांचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच.

रिलेशनशिपमध्ये असताना दोघंही एकमेकांसोबतचे रोमँटीक फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे. अर्थात दोघांचं ब्रेकअप झालं आणि सगळं संपलं. आता काय तर कृष्णाला पश्चाताप होतोय. होय, बॉयफ्रेन्डसोबतचे फोटो शेअर करणे, त्याच्याबद्दल जगाला ओरडून ओरडून सांगणं आपली चूक होती, याची जाणीव तिला झालीये.

एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिनं हे बोलून दाखवलं. ती म्हणाली, मी रिलेशनशिपमध्ये होती. पण मी हे जगाला सांगण्याची गरज नव्हती. खरं तर मी एकदम प्रामाणिक होती, म्हणून मी या नात्याबद्दल सोशल मीडियावर सांगितलं होतं. पण लोकांना हे नातं स्वीकारताना जड गेलं. लोक सहज स्वीकारत नाहीत. म्हणूनच एक गोष्ट मी प्रामाणिकपणे मान्य करते, ती म्हणजे या नात्याबद्दल लोकांना सांगण्याची गरज नव्हती.

मी हे नातं जगासमोर उजागर करून माझी स्वत:ची ओळख गमावून बसली. ब्रेकअपनंतर मी हेच शिकली. जे काही ते मी आहे, माझ्यासाठी आहे आणि माझ्यामुळं आहे. मला स्वत:ची ओळख आहे, हे मला या ब्रेकअपनंतर प्रकर्षानं जाणवलं. कृष्णा आणि इबन यांच्या नात्याची सुरुवात 2019 मध्ये जूनमध्ये झाली होती, त्यानंतर त्यांनी जून 2020 मध्ये इन्स्टाग्रामवर एनिवर्सरीचेही सेलिब्रेशन केले होते. पण नोव्हेंबर 2020 मध्ये कृष्णाने स्वत: सोशल मीडियाद्वारे इबनमधील ब्रेकअपची माहिती दिली होती.

सिंगल लाइफबाबत कृष्णा म्हणाली, ही लाइफ शानदार आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की, मी पूर्णपणे माझ्यावर आणि माझ्या कामावर फोकस करू शकते. आता कोणताही डिस्ट्रॅक्शन किंवा ड्रामा नाही. जे एका रिलेशनशिपमध्ये असतात. इबनपासून वेगळी का झाली यावर ती म्हणाली की, अनेक गोष्टी होत्या ज्यामुळे असं झालं. पण मला या गोष्टी खाजगी ठेवायच्या आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.