‘तारक मेहता’ या मालिकेच्या कलाकारांच्या कुटुंबाला भेटा, चाचाजी ला तर आहेत जुळी मुले आणि एक सुंदर पत्नी…

तारक मेहता का उल्टा चष्मा ही टीव्हीवरील सर्वाधिक चर्चित आणि लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने मनोरंजन विश्वात खूप यश मिळवले आहे. अलीकडेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ने आपली यशस्वी 13 वर्षे पूर्ण केली आहेत. विशेष म्हणजे हा शो 28 जुलै 2008 रोजी सुरू झाला. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे प्रत्येक पात्र चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. आपणा सर्वांना शोच्या कलाकारांच्या ऑनस्क्रीन कुटुंबाबद्दल चांगली माहिती असेल परंतु तुम्हाला ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ च्या कलाकारांच्या वास्तविक कुटुंबाबद्दल माहिती आहे का?

दिशा वाकानी…
या शोमध्ये दया भाभीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव दिशा वाकानी आहे. दया भाभीचे पात्र शोच्या सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक आहे. दिशाने वयाच्या 37 व्या वर्षी 2015 मध्ये बिझनेसमन मयूर पाडियासोबत लग्न केले. या लग्नाला शोचे अनेक कलाकारही उपस्थित होते. मयूर आणि दिशा एका मुलीचे पालक आहेत. वर्ष 2017 मध्ये तिने मुलगी स्तुतीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर तिने हाा शो सोडला. गेल्या 4 वर्षांपासून ती शोचा भाग नाही.

मुनमुन दत्ता …
शोमध्ये बबिता अय्यरच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्रीचे नाव मुनमुन दत्ता आहे. बबिताच्या पात्रालाही बरीच लोकप्रियता मिळाली असून मुनमुनला या भूमिकेत चांगलीच पसंती मिळाली आहे. मुनमुन सुद्धा दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. मुनमुनचे अभिनेता अरमान कोहलीसोबत अफेअर होते, पण ती वयाच्या 33 व्या वर्षीही कुमारिचं आहे. मुनमुन तिच्या आईसोबत मुंबईत राहते.

दिलीप जोशी …
अभिनेता दिलीप जोशी शोमध्ये जेठालाल गडाची भूमिका साकारत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या जेठालालबद्दल सर्वांनाच माहिती आहे. तो या शोचा सर्वात चर्चित अभिनेता आहे. तो अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसला आहे, तसेच 53 वर्षीय दिलीप जोशीच्या पत्नीचे नाव जयमाला जोशी आहे. दोघांना एक मुलगी नियती आणि एक मुलगा रूत्विक आहे. दोघांच्या लग्नाला 20 वर्षांहून अधिक काळ झाला आहे.

शैलेश लोढा …
शैलेश लोढा हा केवळ एक उत्तम अभिनेताच नाही तर लोकप्रिय कवी देखील आहे. शैलेशच्या पत्नीचे नाव स्वाती आहे, आणि त्याांना स्वरा नावाची मुलगी आहे. शैलेश ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

मंदार चांदवडकर…
आपल्या सर्वांना मंदार चांदवडकर आत्माराम तुकाराम भिडेच्या भूमिकेत पाहायला मिळतो. त्याच्या पत्नीचे नाव स्नेहल आहे. दोघेही मुलगा पार्थचे आई -वडील आहेत.

अमित भट्ट…
अभिनेता अमित भट्ट तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये चंपक लाल गडाची भूमिका साकारत आहे. वास्तविक जीवनात अमित भट्टची पत्नी खूप सुंदर आणि ग्लॅमरस आहे. त्याच्या पत्नीचे नाव क्रिती आहे. सौंदर्याच्या बाबतीत ती टीव्ही अभिनेत्रींशी स्पर्धाही करते. अमित आणि कृती जुळ्या मुलांचे पालक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.