सुहाना खान पेक्षाही जास्त होत आहे शाहरुख खानची भाची…

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचे प्रचंड चाहते आहेत. चाहत्यांची क्रेझ ही फक्त स्टार्सपुरती मर्यादित नसते तर, ते त्यांच्या मुलांवर सुध्दा मनापासून प्रेम करतात. स्टार किड्सची फॅन फॉलोइंग कोणत्याही स्टारपेक्षा कमी नाहीये, मग ते सुहाना खानपासून ते आर्यन आणि अब्रामपर्यंत कोणाबद्दलही असो. पण त्यांच्यासाठी अजून एक नाव जोडले गेले आहे आणि हे नाव आलिया छिब्बाचे आहे.

आलिया छिब्बा शाहरुख खानची पत्नी गौरी खानहीचा भाऊ विक्रांतची मुलगी आहे. म्हणजेच आलिया गौरी खानची भाची आहे. गौरी खानची भाची असल्याने ती शाहरुख खानचीही भाची आहे. आलिया सुहानाची चुलत बहीण आहे आणि ती सोशल मीडियावर खूप सक्रिय राहते, व तिचे सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

आलियाचे इन्स्टाग्राम अकाउंट बघितल्यावर कळते की ती किती ग्लॅमरस आहे. मीडिया रिपोर्टनुसार, तिने फॅशनशी संबंधित अभ्यास केला आहे आणि तिला स्वतःचा फॅशन ब्रँड तयार करायचा आहे. आलियाने कोरोना साथीच्या काळात वेगवेगळ्या सॉक्सची लाईन लाँच केली आहे. तसेच आलियाने 2019 मध्ये कोलकात्यात लग्न केल्यावर ती प्रसिद्धीत आली होती.

आलियाने लग्नातील काही फोटो शेअर केले, ज्यात ती बहीण सुहाना खानसोबत पोज देताना दिसत आहे. चित्रे शेअर करताना आलियाने लिहिले, “मी विवाहित आहे यावर माझा विश्वास बसत नाहीये.” आलिया तिची फॉई गौरी खानच्या खूप जवळ आहे. ती अनेकदा शाहरुखच्या कुटुंबासोबत वेळ घालवते. आलियाने 21 व्या वर्षी लग्न केले आहे.

तसेच आलिया खूप सुंदर आणि स्टायलिश आहे. ती स्वत:ला लेटेस्ट ट्रेंडसह अपडेट ठेवते. कोरोनाच्या काळात तीने आपले दोन ब्रॅण्ड देखील उघडले आहेत.तीने स्टायलिश मास्कचे उत्पादनही सुरू केले आहे. आलिया तिची बहीण आणि शाहरुख खानची लाडकी सुहाना खानसारखीच बोल्ड आहे. आलियाचे इन्स्टाग्रामवर प्रचंड चाहते आहेत. इन्स्टाग्रामवर तीला 1 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.

त्याच वेळी, आलिया छिब्बा देखील सौंदर्यामध्ये सुहाना खानपेक्षा कमी नाहीये. सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या फोटोंवरून अंदाज लावला जाऊ शकतो की आलिया छिब्बावर प्रेम करणारे बरेच लोक आहेत. तीचे फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Leave a Reply

Your email address will not be published.