मीना कुमारी हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तीच्या काळात तीला तोड नव्हती. एक लहान करिअर आणि एक लहान आयुष्य, असूनही तिने खूप मोठे काम केेले होते. हे जग सोडून तीला जवळपास 50 वर्षे झाली आहेत. मीना कुमारीचा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला. तिचा जन्म 1 ऑगस्ट 1933 रोजी मुंबईत झाला. तिच्या वडिलांचे नाव अली बक्ष आणि आईचे नाव इकबाल बेगम होते. तर मीना कुमारीचे नाव मेहजबीन बानो असे होते.
चित्रपटांमध्ये पाऊल टाकताना मेहजबीन बानो मीना कुमारी बनली. या मुस्लिम अभिनेत्रीने एक हिंदू नाव ठेवले आणि नंतर हे नाव तिची ओळख बनली. एक उत्तम अभिनेत्री असण्याव्यतिरिक्त मीना कुमारी कवयित्री आणि पार्श्वगायिका देखील होती. असे म्हटले जाते की, मीनाचे पालक तिलावाढवण्यासाठी सक्षम नव्हते, यामुळे मीनाला जगात येताच प्रचंड वेदना सहन कराव्या लागल्या. मीनाचे वडील आली याांनी तिला यतीम खानच्या बाहेरच्या पायऱ्यांवर सोडले होते.
मात्र, काही काळानंतर अलीने लहान मुलीचा किंचाळण्याचा आवाज ऐकला आणि त्यांनी पुन्हा आपल्या मुलीला आपल्या घरी आणले. असे म्हटले जाते की वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी ती ‘फरजाद-ए-हिंद’ चित्रपटात दिसली होती. तीला तीची मोठी आणि खरी ओळख 1952 मध्ये ‘बैजू बावरा’ चित्रपटातून मिळाली. विशेष गोष्ट म्हणजे या चित्रपटासाठी मीनाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. या दरम्यान, मीनाचे वय फक्त 19 वर्षे होते आणि त्याच वयात तिचे लग्न झाले.
तथापि, नंतर जेव्हा मीनाच्या वडिलांना कळले की त्यांच्या मुलीने कमलशी गुपचूप लग्न केले आहे, तेव्हा ते खूप रागावले आणि त्यांनी हे लग्न स्वीकारण्यास नकार दिला. कमल अमरोही आधीच विवाहित होता, असे असूनही त्याने मीनाशी दुसरे लग्न केले होते. त्याच वेळी, जेव्हा कमलच्या पत्नीला हे कळले तेव्हा ती तिच्या मुलांसह गावी गेली. मीना आणि कमलचे वैवाहिक आयुष्य धोक्यात आले आणि कमलने मीनाला पत्र लिहून लग्न मोडण्याची विनंती केली. मीनाचे उत्तर आले की, ‘मला वाटते की तु मला समजू शकला नाही आणि समजण्यासही सक्षम होणार नाहीस. तू मला घटस्फोट दे…
तथापि, नंतर मीना आणि कमल पुन्हा जवळ आले आणि यावेळी मीनाला वडिलांनी घराबाहेर काढले. मात्र, त्यानंतर कमलने मीनावर अनेक निर्बंध लादले. कमलने स्पष्टपणे मीनाला सांगितले की तीने स्वत: च्या कारने प्रवास करावा, मेकअप मॅन व्यतिरिक्त इतर कोणालाही तीच्या मेकअप रूममध्ये प्रवेश करू देऊ नका, संध्याकाळी 7 वाजण्यापूर्वी शूटिंग पूर्ण करावी. मीनानेही तेच केले पण तरीही दोघांमधील संबंध बिघडले आणि दोघे घटस्फोटाच्या टप्प्यावर आले. मीना कुमारी ने वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला होता. ती काही गंभीर आजाराची शिकार झाली होती आणि तिला झोपही येत नव्हती.