अशा अनेक स्टार्स आहेत ज्यांनी आपली एग्ज फ्रीज करण्याबद्दल बोलले आहे. एकता कपूरपासून मोना सिंग आणि राखी सावंतपर्यंत अशा अनेक स्टार्स आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात हे मोठे पाऊल उचलण्याची चर्चा केली आहे. आता यामध्ये अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे नावही समाविष्ट झाले आहे. काजोलची बहीण अभिनेत्री तनिषा मुखर्जीने खुलासा केला आहे की तिने वयाच्या 39 व्या वर्षी तिची एग्ज फ्रीज केली होती.
तनिषाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे. या दरम्यान, तिने हे देखील सांगितले की तिला वयाच्या 33 व्या वर्षी ही प्रक्रिया करायची आहे, परंतु नंतर डॉक्टरांनी तिला तिचे आरोग्य पाहता असे न करण्याचा सल्ला दिला होता. त्याच वेळी, तीने सांगितले की स्त्रीच्या आयुष्यात लग्न करणे आणि मुले होणे आवश्यक आहे असे तिला वाटत नाही.
एका मुलाखतीत तनिषाने सांगितले होते की- मला वयाच्या 33 व्या वर्षी माझी एग्ज फ्रीज करायचे होते. त्यावेळी मी माझ्या डॉक्टरांकडे देेखिल गेेले होते. हे फनी आहे पण त्या वेळी त्यांनी मला हे करण्यास मनाई केली. त्यांनी सांगितले की याचा माझ्या शरीरावर परिणाम होऊ शकतो. बेबी कंसिव करण्याची आशा नसताना मी हे करावे, असा सल्ला त्यांनी मला दिला होता. ही वैयक्तिक निवड आहे आणि आजच्या काळात मुले न होण्यास काहीच हरकत नाही.
‘तनिषा पुढे म्हणाली- ‘मला मुलं नव्हते आणि या सर्व गोष्टी माझ्या मनात फिरत होत्या. पण शेवटी मार्गदर्शन मिळाल्यावर मी माझी एग्ज फ्रीज करण्याचा निर्णय घेतला. स्त्रीच्या आयुष्यात तीची सर्वात मोठी इच्छा म्हणजे फक्त मुले असणे नाहीये. 2003 मध्ये रिलीज झालेल्या ‘Sssshh …’ द्वारे तनिषाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तीने ‘नील’ एन ‘निकी’, ‘सरकार’, ‘टँगो चार्ली’ आणि ‘वन टू थ्री’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले.