कोणीही जबरदस्ती करत नाही, मागितलेले पैसे मिळतात, सलमानच्या गर्लफ्रेंडने राज कुंद्रा बद्दल केला मोठा खुलासा!!

अश्लील चित्रपट बनवल्याबद्दल आणि ते अॅपवर रिलीज केल्याबद्दल राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे, त्यावर सलमानच्या गर्लफ्रेंडने राज कुंद्राच्या बाजूने प्रतिक्रिया आली आहे. अभिनेता सलमानची माजी गर्लफ्रेंड सोमी अलीने पॉ’र्न चित्रपटांना न्याय न देण्याविषयी बोलले आहे. राज कुंद्राचे नाव न घेता, सोमी अली ने म्हटले आहे की, जे लोक पॉ’र्न चित्रपटांना त्यांचा व्यवसाय म्हणून निवडतात त्यांना आपण जज करु नये. कारण यात कोणासोबतही जबरदस्ती होत नाही.

माध्यमांशी केलेल्या विशेष संभाषणात ती पुढे म्हणाली की, ‘जेव्हा आपण पॉ’र्न किंवा सेक्सशी संबंधित गोष्टींबद्दल बोलतो, तेव्हा लोकांना उत्सुकता वाटते. ज्यांनी पो’र्न चित्रपटांना आपला व्यवसाय म्हणून निवडले आहे त्यांना मी अजिबात जज करत नाही. ज्यांनी हा व्यवसाय निवडला आहे, त्यांच्यावर कोनालाही काहीही बोलण्याचा अधिकार नाही. जोपर्यंत त्यात जबरदस्ती नाही तोपर्यंत हे चुकीचे नाहीये. सोमी अलीच्या मते, आपण आपल्या देशात लैं’गि’क शिक्षणालाही प्रोत्साहन दिले पाहिजे.

सोमी अली खानने चित्रपटांमध्ये आणि वेब सीरिजमधील इंटीमेट सीन्सवरही आपले मत दिले आणि सांगितले की ‘इंटीमेसी शिवाय कोणतेही इंटीमेट लव सीन होत नाही’. उल्लेखनीय म्हणजे, 19 जुलै रोजी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला गुन्हे शाखेने अ’श्ली’ल चित्रपट बनवल्यामुळे चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीनंतर त्याला ताबडतोब अटक करण्यात आले. अटकेनंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. जिथून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचीही चौकशी करण्यात आली आहे. पोलिसांनी शिल्पाच्या घरी जाऊन तिची चौकशी केली जी 6 तास चालली. या दरम्यान राज देखील तेथे उपस्थित होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा राजवर खूप चिडली होती आणि त्याच्याशी भांडतही होती. शिल्पा वारंवार सांगत होती की तु खूप बेईमानी केली आहे. हे सर्व करण्याची गरज काय होती? मात्र, पोलिसांसमोर शिल्पाने राजला निर्दोष म्हटले व सांगितले की, तो केवळ इंटीमेट चित्रपट बनवायचा, पॉर्न नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.