राज कुंद्रा बद्दल काही पोस्ट करणार असताल तर सावधान,29 जणांविरुद्ध बदनामीचा खटला दाखल,पतीची इमेज खराब झाल्याने शिल्पा शेट्टी चे पाऊल!!

राज कुंद्राची पत्नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात 29 पत्रकार आणि मीडिया हाऊसेसविरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. ज्यावर आज सुनावणी होणार आहे. शिल्पा शेट्टीने दाखल केलेल्या या खटल्यात तिने म्हटले आहे की, हे लोक तिची खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत.

शिल्पाने कोर्टाकडे मागणी केली आहे की माध्यमांना तिच्याविरुद्ध अपमानास्पद साहित्य प्रकाशित करण्यापासून रोखले जावे. ज्यांच्या विरोधात शिल्पाने हा खटला दाखल केला आहे. त्यात फेसबुक, इन्स्टाग्राम आणि गुगलचाही समावेश आहे. शिल्पा शेट्टीने म्हटले आहे की माध्यमांद्वारे तिच्या गोपनीयतेचे उल्लंघन केले जात आहे.

तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चुकीच्या आणि अपमानास्पद गोष्टी सांगितल्या जात आहेत. पोर्नोग्राफी प्रकरणात चुकीच्या अहवालाद्वारे तीची इमेज खराब केली जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न फिल्म बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात शिल्पा शेट्टीचीही चौकशी करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने शिल्पाच्या घरी जाऊन तिची सुमारे 6 तास चौकशी केली.

गुन्हे शाखेच्या टीमने आपल्या आरोपपत्रात कुंद्रावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. आरोपपत्रानुसार, राजची कंपनी अश्लील चित्रपटांचा व्यवसाय 150 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याच्या योजनेवर काम करत होती. जेव्हा गूगल आणि ॲपलने त्यांचे हॉटशॉट ॲप बंद केले. तेव्हापासून प्लॅन बी वर काम सुरु झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजला फेब्रुवारीमध्येच त्याच्या अटकेची भणक लागली होती. खरं तर, 4 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलच्या टीमने मालाडच्या मढ बेटावर वेबसीरिजच्या नावावर चालणाऱ्या अश्लील चित्रपटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या छाप्यात पाच जणांना अटक करण्यात आली.

अभिनेत्री गेहना वसिष्ठलाही अटक झाली. काही महिन्यांनंतर कुंद्राच्या कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक उमेश कामतलाही अटक करण्यात आले. त्याने संपूर्ण रॅकेट पोलिसांसमोर उघड केले होते. मात्र, पोलिसांना तपासात असे अनेक पुरावे सापडले. जे राजच्या विरोधात होते. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी राज कुंद्राला 19 जुलै रोजी चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर त्यांला अटक करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.