बॉलिवूडमध्ये ‘संजू बाबा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या संजय दत्तला कोण ओळखत नाहीये. इतकेच नाही तर संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट संजू हा बनला होता. ज्यामध्ये संजय दत्तच्या जीवनाशी संबंधित किस्से टाकण्यात आले होते. जसे की, वडिलांशी राग, आई ला गमावणे, एक स्टार होणे, उंचीवरून जमिनीवर पडणे, द’ह’शतवा’दी असल्याचा आरोप होणे. शिक्षा भोगणे, कम बॅक करणे, आणि विवाह करणे इ…
एवढेच नव्हे तर आपणा सर्वांना ठाऊक असेल की संजयनेही आपल्या कारकीर्दीत बर्याच वेळा अशा परिस्थितींचा सामना केला होता जेव्हा त्याच्या स्वतःच्या जिवलग मित्रांनीही त्याची साथ सोडली होती, तर त्याने अनेक स्टार्सशी दुश्मनीही केली आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक नायक आहेत ज्यांच्याशी संजय दत्तचे मतभेद झाले होते.
संजय दत्त आणि गोविंदा…
संजय आणि गोविंदाच्या जोडीने अनेक चित्रपटात प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ही जोडी हसीना मान जायगी, जोडी नंबर 1, दो कैदी अशा बर्याच चित्रपटांमध्ये एकत्र दिसली. चित्रपट निर्मात्यांनाही दोघांची जोडी खूप आवडली. पण काही वर्षांपूर्वी जेव्हा एक ऑडिओटेप लीक झाला होता तेव्हा गोविंदा छोटा शकील आणि संजू बाबाला शिवीगाळ करत होता. या टेपमुळे त्यांच्यातील नात्यात फाटा फुटला आणि असे घडले की या घटनेनंतर दोघेही कधीही एकमेकांशी बोलले नाहीत.
संजय दत्त आणि आमिर खान…
अलीकडच्या काळात पत्नीच्या घटस्फोटामुळे चर्चेत आलेला बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानशीही संजय दत्तचे संबंधही खास नाहीत. परंतु त्यांच्यात वाद असूूनही दोघेही विधु विनोद चोप्राच्या पीके चित्रपटात एकत्र काम करण्यास तयार झाले होते. रिपोर्टनुसार विधू विनोद चोप्रामुळे संजयने हा चित्रपट करण्यास सहमती दर्शविली होती.
माधुरी दीक्षित आणि संजय दत्त…
संजय दत्तची दुश्मनी फक्त बॉलिवूड कलाकारांशीच नाही. तर संजू बाबांनी अभिनेत्रींसोबतही दुश्मनी केली आहे. ही गोष्ट 1991 सालची आहे. ‘साजन’ चित्रपटात काम करत असताना दोघांमधील जवळीक वाढली होती. एकेकाळी संजय दत्तच्या माधुरी दीक्षितशी जोडलेल्या लिंकअपवर बरीच चर्चा होती.तसेच दोघांनीही लग्न करण्याची तयारी दर्शविली होती, पण या दरम्यान मुंबई बॉम्बस्फोटमुळेे संजयवर आरोप लावला गेला व त्याला जेल मध्ये पाठवले गेले, यामुळे माधुरीनेही त्याच्याबरोबरचे सर्व संबंध तोडले.
शाहरुख खान आणि संजय दत्त…
शाहरुख आणि बॉलिवूडचा किंग खान यांच्यात कोणतेही खास नाते नाहीये. असं म्हणतात की जेव्हा संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री मेहबूब स्टुडिओमध्ये एकत्र आली होती. सिने आर्टिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष होण्यासाठी अमजद खान प्रयत्नशील होता. त्या काळात शाहरुख खानला बरीच प्रसिद्धी मिळू लागली होती. त्या काळात संजय दत्तने शाहरुख खानबरोबर त्याने शारिरीक संबंध केले आहेत असे म्हंटले होते. मात्र नंतर ‘ओम शांती ओम’ या टायटल साँगमध्ये दोघे एकत्र दिसले होते.
संजय दत्त आणि अभिनेत्री पद्मिनी…
अभिनेत्री पद्मिनीशी त्याचा वैर असा होता की, एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान संजय पद्मिनीच्या मागे चाकू घेऊन पळाला होता. या घटनेनंतर सुनील दत्तने त्याला रीहब सेंटर येथे पाठविले होते.
संजय दत्त आणि सल्लू मियां…
एकेकाळी सलमान खान आणि संजय दत्तची जोडी चित्रपटाच्या पडद्यावर चांगली फिट असायची. अशा परिस्थितीत या यादीमध्ये सलमानचे नाव पाहून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, ते कारण दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. संजय दत्तने सलमानच्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता तेव्हा संजू-सलमानची मैत्री तुटली होती.
राजेश खन्ना आणि संजय दत्त…
संजय दत्तचे प्रसिद्ध कलाकार राजेश खन्ना याच्याशी खास संबंध नव्हते. टिना मुनिम हे यामागचे कारण होते, कारण संजय दत्तपासून विभक्त झाल्यानंतर टीना मुनीमने राजेश खन्नाबरोबर सौतन या चित्रपटामध्ये काम केले होते. हे पाहून संजय राजेश खन्ना शूटिंग करत असलेल्या एका चित्रपटाच्या सेटवर गेला होता, ज्यामुळेे तो त्याला टीनापासून दूर राहण्याची धमकी देईल. आणि मग येथून दोघांची दुश्मनी झाली.