आजच्या काळात बाहेरून येऊन बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नाव कमावणे कोणासाठीही सोपे नाहीये. इतकेच नाही तर या चित्रपटसृष्टीत येण्यासाठी नव्या कलाकारांना खूप कठीण समस्यांना सामोरे जावे लागते. जी अद्याप ओळखली गेलेली नाही. त्यापैकी आज आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल सांगत आहोत, तीचा बॉलिवूडमधील प्रवास खूपच रोमांचक राहिला आहे.
होय आम्ही राधिका मदन बद्दल बोलत आहोत. आज राधिका तिच्या जबरदस्त अभिनयामुळे अनेकांची पसंत बनत आहे. मेहनतीच्या बळावर उंचीवर पोहोचलेल्या राधिका मदनने नुकताच एक धक्कादायक विधान केले असून यामुळेे ति रातोरात प्रसिद्ध झाली आहे.
टीव्हीच्या जगातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी राधिका मदनने एका मुलाखती दरम्यान काही आश्चर्यकारक खुलासे केले आहेत. ज्यानंतर तीच्या वडिलांची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती. कलर्स टीव्ही चॅनलच्या प्रसिद्ध शो “मेरी आशिकी तुम से ही” मधून राधिकाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेत ती मुख्य अभिनेत्री होती.
त्याचवेळी राधिकाला बॉलिवूडमध्ये “पटाखा” या चित्रपटाने पहिला ब्रेक मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज ने केले होते. राधिकाच्या मते तिचा पहिला चित्रपट होता “मर्द को डर नहीं होता”. पण पटाखाचं शुटिंग आधी संपलं होतं, म्हणून तिचा तो पहिला चित्रपट म्हणून समोर आला.
पण हे खरे आहे की राधिका मदनला तिच्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या शूटिंग दरम्यान गर्भनिरोधक गोळी घ्यावी लागली होती. राधिकाने एकदा याबद्दल सांगितले होते की, “मला पहिल्या शॉटसाठी गर्भनिरोधक गोळी खरेदी करण्यास सांगितली होती, त्यावेळी माझे पालक मला सरप्राइज देण्यासाठी दिल्लीत येत होते.
पापाने जेव्हा ती औषधे पाहिली तेव्हा त्यांना खूप विचित्र वाटलं होतं. जेव्हा राधिका मदनच्या वडिलांनी आपल्या मुलीजवळच्या त्या गोळ्या पाहिल्या तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली… राधिकाने मुलाखती दरम्यान सांगितले आहे की, “माझ्या पहिल्या शूटबद्दल माझे वडील लोकांना काय उत्तर देतील, यामुुळे मी खुप नाराज होते.
राधिका मदनने भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दासानी सोबत “मर्द को दर्द नहीं होता” या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट जरी अगदी थोड्या पडद्यावर प्रदर्शित झाल्या मुळे, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकला नाही. त्याचवेळी इरफान खानच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ‘आंग्रेझी मीडियम’ उत्तम हिट ठरला, त्यानंतर राधिकाला बरीच दाद मिळाली.