श्रीदेवीने वयाच्या चौथ्या वर्षी बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती,श्रीदेवीने बॉलिवूड मद्ये येण्यापूर्वी तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या चित्रपटात काम केले होते. श्रीदेवीला लेडी अमिताभ बच्चन आणि पहिल्या सुपरस्टारचा दर्जा दिला जातो. अशा परिस्थितीत आपण तीच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.
1989 मध्ये आलेला श्रीदेवीचा चालबाज हा चित्रपट तुम्ही पाहिलाच असेल आणि तो श्रीदेवीच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की ‘ना जाने कहां से आए हैं ये लडकी’ या प्रसिद्ध गाण्याच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्रीला 103 डिग्री ताप आला होता पण अभिनेत्रीने विश्रांती घेण्याऐवजी शूटिंग पूर्ण केली होती.
या गाण्याच्या शूटिंग दरम्यान श्रीदेवीला तीव्र ताप होता, परंतु इतका तीव्र ताप असूनही श्रीदेवी पावसाच्या पाण्यात भिजत सतत असताना शूटिंग पूर्ण केली होती. हे गाणे त्या काळात खूप लोकप्रिय झाले. श्रीदेवीला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. हे गाणे त्या काळातच नव्हे तर आजही खूप लोकप्रिय आहे.