गरज असतानाच राजेश खन्नाला का सोडून गेली डिंपल , हे आहे दडलेलं रहस्य!!

18 जुलै 2021 या दिवशी बॉलीवूड ज्येष्ठ अभिनेता राजेश खन्ना याची 10 वी पुण्यतिथी होती. 18 जुलै 2012 रोजी त्याचे निधन झाले. 70 आणि 80 चे दशक असे होते, जेव्हा राजेश खन्नाचे नाव प्रत्येकाच्या जिभेवर असायचे. जरी तो जगाला कायमचा निरोप देऊन गेला असला, तरी तो त्याच्या चाहत्यांच्या हृदयात कायमचा अमर झाला आहे.

अभिनेत्री डिंपल कपाडियाने जेव्हा त्याच्या आयुष्यात प्रवेश केला तेव्हा राजेश खन्नाचे सुंदर आयुष्य अधिक सुंदर झाले. राजेश खन्नाने आपल्यापेक्षा 16 वर्षांनी लहान असलेल्या डिंपलशी लग्न केले. राजेश खन्नाच्या त्या एका निर्णयाने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले. लग्नाच्या काही वर्षांसाठी सर्वकाही व्यवस्थित होते, परंतु काळानुसार त्यांच्या नात्यात कटुता निर्माण होऊ लागली.

राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांच्यातील प्रेमाची सुरूवात ‘बॉबी’ चित्रपटापासून झाली. त्या काळात राजेश खन्ना 32 वर्षांंचा होता, आणि डिंपल फक्त 16 वर्षांची होती. लग्नानंतर काही काळ दोघेही एकमेकांवर खूप खुश होते, पण हळू हळू दोघांमध्ये तणाव वाढू लागला. लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांची पहिली मुलगी ट्विंकल खन्नाचा जन्म आणि काही काळानंतर लहान मुलगी रिंके खन्नाचा जन्म झाला.

राजेश खन्ना एक अशी व्यक्ती होती, ज्याची फिल्मी कारकीर्द खूप सुंदर होती, परंतु वैयक्तिक आयुष्यातला त्याचा बहुतेक वेळ हा ताणतणावात जात असे. हळूहळू त्यांच्यात अंतर वाढू लागले. असे म्हणतात की डिंपल कपाडिया ही राजेश खन्नाला कधीच समजू शकली नाही. जरी दोघे एकमेकांपासून दूर राहत होते, परंतु त्यांनी कधीही घटस्फोट घेतला नाही.

यामागील एकमेव कारण म्हणजे त्यांच्या दोन्ही मुली. डिंपल लग्न करून खूष नव्हती, परंतु जेव्हा तिला दोन्ही मुली झाल्या तेव्हा तिने आपल्यापेक्षा मुलींच्या भविष्याचा जास्त विचार केला. तिला मुलींना चांगली लाईफ द्यायची होती. नंतर परिस्थिती अशी बनली की लग्नाच्या 11 वर्षानंतर डिंपलने घटस्फोट न घेता राजेश खन्ना ला सोडून गेली. राजेश खन्ना चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होऊ लागला. या दरम्यान त्याचे नाव कधी अंजू महेंद्रूशी तर कधी टीना मुनिमशी जोडले गेले.

असे म्हटले जाते की डिंपल कपाडिया जेव्हा राजेश खन्नाला सोडून निघून गेली तेव्हा टीना मुनिम त्याच्या घरी त्याच्या जवळ राहायला लागली. टीनाला राजेश खन्नाशी लग्न करायचं होतं, पण डिम्पलपासून त्याचा घटस्फोट झाला नव्हता, यामुळे टीनाला समजलं होतं की राजेश खन्ना लग्न करू शकणार नाही आणि म्हणूनच काही काळानंतर तिनेही त्याला सोडलं

जेव्हा राजेश खन्ना खूप आजारी पडला होता, तेव्हा त्याची काळजी घेण्यासाठी डिंपल कपाडिया त्याच्याकडे रहायला आली होती. शेवटच्या दिवसात, त्याला संपूर्ण कुटुंबाचे संपूर्ण समर्थन आणि प्रेम मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published.