आदित्य 369″ या ’चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ज्येष्ठ अभिनेता आणि हिंदूपुरचा वर्तमान विधायक नंदमुरी बाळकृष्ण यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीच्या दरम्यान, त्याने कबूल केले की दिग्दर्शक सिंगीतम श्रीनिवास रावने त्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जे काही करण्यास सांगितले होते ते त्याने जसेच्या तसे करण्याचा प्रयत्न केला.
तो म्हणाला की, अभिनयात नाविन्य आणण्याचा उत्तम मार्ग म्हणजे, एखाद्याचे अनुकरण करणे. तसेच तो पुढे म्हणाला, “मी माझ्या अभिनेत्रींना नेहमी सांगतो की तेथे दहा मुली नाचताना पाहा, सर्वोत्कृष्ट मुली निवडा आणि त्यांचे अनुकरण करा. माधुरी दीक्षितसारख्या मोठ्या अभिनेत्रींनीही असे केले आहे. ते नृत्यदिग्दर्शक सरोज खान चे अनुकरण करायचे. ”
श्रीदेवीसारख्या अभिनेत्रीं अभिनय कशा प्रकारे शिकल्या यावर आपले मत व्यक्त करताना बालकृष्ण म्हणाला, “इतर अभिनय कौशल्यांबद्दल बोलताना, माझ्या वडिलांनी श्रीदेवी आणि सर्वांना त्यांच्या नितंबावर थाप मारुन व पायावर महुर लावून त्यांना अभिनय करायला शिकवला. तसेच, बालकृष्णाने केवळ श्रीदेवीच नव्हे तर ऑस्कर विजेता ए.आर. रहमान याचा देखील अपमान केला आहे.
टॉलीवूड ज्येष्ठ दिवंगत एनटी रामाचा मुलगा बाळकृष्ण ने ए.आर. रहमान याला ओळखण्यास नकार दिला. त्याला जेव्हा रहमानबद्दल त्याला पश्न विचारला गेला, तेव्हा त्याने प्रत्युत्तर दिले की कोण एआर रहमान. गंमतीची गोष्ट म्हणजे ए.आर. रहमानने बालकृष्णाच्या निप्पू रवैया या चित्रपटात संगीत दिलेले आहे.