तारक मेहता का उलटा चश्माच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी!!दया नंतर आता बबीताही सोडणार शो!!

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेचा आणि हिट शो ‘तारक मेहता का उलटा चश्मा हा बर्‍याच वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शोचे प्रत्येक पात्र प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ हा शो बर्‍याचदा काही ना काही कारणामुळे चर्चेत असतो. काहीवेळा त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात तर काहीवेळा तो कास्ट मुळे चर्चेत राहतो.

अलीकडे या शोशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे, जी चाहत्यांना धक्का देऊ शकते. स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, ‘तारक मेहता …’ ची सर्वाधिक चर्चेची आणि आवडती अभिनेत्री मुनमुन दत्ता शो सोडू शकते. बातमीनुसार मुनमुन बऱ्याच दिवसांपासून सेटवर येत नाहीये. वास्तविक, महाराष्ट्रातील कोविड रुग्णांमध्ये वाढझाल्या दरम्यान या कार्यक्रमाचे शूटिंग दमन मद्ये चालू होती.

पण अलीकडेच संपूर्ण टीम मुंबईला परतली असून इथेच शूटिंग सुरू आहे. पण आजकाल मुनमुन सेटवर येत नाहीये आणि तिच्या सेटवर न आल्यामुळे तिच्यासाठी याक्षणी कोणत्याही लाईन्स लीहिेल्या जात नाहीत. स्पॉटबॉयशी बोलताना एका सूत्राने सांगितले आहे की, “मुनमुन दत्त एका जाती समुदायासाठी वापरलेल्या अपमानास्पद शब्दाच्या वादात अडकली आहे, तेव्हापासून ती सेटवर दिसली नाहीये.

परंतु बातम्या जोरात सुरू आहेत की, मुनमुनने हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुनमुन या शोच्या मुख्य कलाकारांपैकी एक आहे. या मालिकाव्यतिरिक्त ती तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे बर्‍याचदा चर्चेत राहते. जर मुनमुनने हा कार्यक्रम सोडल्याची बातमी जर खरी असेल तर दया बेननंतर निर्मात्यांना हा दुसरा मोठा धक्का असू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published.