अर्जुन कपूर आणि मलायका अरोडा गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. वयाचे अंतर असल्यामुळे या दोघांनाही बर्याच वेळा ट्रोल केले गेले आहे. असे असूनही, ते दोघेही नात्यात कायम आहेत. या दोघांना बर्याचदा चित्रपट पार्ट्यांमध्ये, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आणि कौटुंबिक कार्यात एकत्र पााहीले आहे.
तसेच, बर्याच लोकांना या दोघांची जोडी आवडत नाही कारण मलायका अर्जुनपेक्षा 12 वर्षांनीं मोठी आहे. यामुळेच सोशल मीडियावर दोघांनाही बर्यापैकी ट्रोल व्हावे लागते. तसेच नुकताच झालेल्या एका मुलाखतीत मलायकाने काही खुलासे केले आहेत. हे ऐकल्यानंतर या दोघांना ट्रोल करणारे तर आणखी अधिक सक्रिय होतील..
आपल्या आणि अर्जुनच्या नात्याविषयी बोलताना मलायका अरोरा म्हणाली आहे की, “तिला अर्जुनकडून एक मूल हवे आहे. 46 वर्षांची झालेली मलायका आई होण्याची आकांक्षा ठेवत, ति अर्जुनबरोबर कुटुंब सुरु करण्याचे स्वप्न पाहत आहे. तर आपल्या आणि अर्जुनच्या लग्नाबद्दल ती म्हणाली की आमच्या नात्यात आम्ही एकावेळी एक पाऊल पुढे टाकत आहोत.
इतकेच नाही तर अर्जुनने एका मुलाखतीत असेही म्हटले होते की तो आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप आनंदी आहे. याखेरीज त्याने आत्मविश्वासाने असेही म्हटले होते की गुप्त लग्न करुन आचार्यचकित करणार नाही, तर जेव्हा तो लग्न करेल तेव्हा तो सर्वांना नक्कीच सांगेल.
तसेच काही लोक त्या दोघांच्या नात्याबद्दल ट्रोल करत आहेत, तर दुसरीकडे त्यांचे चाहते खूप खुश आहेत. तसेच मलायका अरोरा आणि अरबाज खानचा वर्ष 2017 मध्ये घटस्फोट झाला. या दोघांनाही मुलगा अरहान आहे. घटस्फोटानंतर मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्याचवेळी अरबाज खान जॉर्जिया अँड्रेनियाबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे.