काय??सलमान खान विवाहित आहे??17 वर्षाच्या मुलीबरोबर दुबईमध्ये राहते पत्नी, अभिनेत्याने स्वत:च केला खुलासा

बॉलिवूडचा सुपरस्टार म्हटला जाणारा सलमान खान बहुधा चर्चेत राहतो. केवळ त्याच्या चित्रपटांमुळे किंवा अभिनयामुळेच नव्हे तर वैयक्तिक आयुष्यामुळेही तो चर्चेचा मुख्य विषय असतो. वयाच्या 55 व्या वर्षीही सलमान अजूनही कुवारा आहे, बरेच लोक त्याच्या लग्नाबद्दल खूप चिंतेत असतात. इतकेच नाही तर बरेच लोक सलमानशी लग्न का करत नाहिस? यावरही बरेच विश्लेषण करत राहतात.

खरं तर, नुकत्याच झालेल्या खुलाशात असा दावा केला जात आहे की सलमान खान विवाहित आहे. सलमानचे जि च्याशी लग्न झाले आहे ती दुबईमध्ये राहते, एवढेच नाही तर सलमानला 17 वर्षाची मुलगीही आहे. या दाव्यामुळे सोशल मीडियावर बरीच खळबळ उडाली आहे. हे ऐकून भाई जानचे चाहतेही स्तब्ध झाले आहेत. विशेष म्हणजे सलमानचा धाकटा भाऊ अरबाज खान अलीकडेच आपल्या टॉक शोच्या दुसर्‍या सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

या नव्या सीझनलाही बरीचशी प्रसिद्धी मिळाली आहे. त्याचा प्रोमोही सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. अरबाज खान आपला पहिला सीझन सुपरस्टार भाई सलमान खानसह सुरू करत आहे. या शोच्या एका भागात अरबाज खान लोकांची ट्वीट आपल्या पाहुण्यांना वाचून सांगतो, आणि मग पाहुण्यांनाही त्याचे उत्तर द्यायचे आहेत. दरम्यान, युजरचे असे ट्विट सलमान आणि अरबाज यांच्यासमोर आले आणि ते वाचल्यानंतर या दोघांनाही आश्चर्य वाटण्याचे काहीच स्थान राहिले नााही. या ट्विटला सलमानने प्रत्युत्तरही दिले आहे.

आपल्या शोमध्ये अरबाज खानने एका वापरकर्त्याचे ट्विट बॉलिवूडच्या भाईजानला सांगितले, अरबाजने वाचलेले ट्विट असे होते की- ‘लपून कुठे बसला आहे? भारतातील प्रत्येकाला हे माहित आहे की तू आपली पत्नी नूर आणि 17 वर्षाची मुलगी यांच्यासह दुबईत आहेस. तु किती काळ भारतीय लोकांना फसवणार आहे? ‘हे ट्विट वाचून सलमान आणि अरबाज बरेच चकित झाले. त्यानंतर सलमानने विचारले हे कोणासाठी आहे? त्यानंतर अरबाज त्याला सांगतो की हे फक्त त्याच्यासाठी म्हणजेच सलमान खानसाठी आहे.

या वापरकर्त्याला उत्तर देताना सलमान म्हणाला- ‘या लोकांना बरंच काही माहिती आहे. ही सर्व बकवास आहे. मला माहित नाही की कोणाबद्दल बोलत आहे आणि कोठे पोस्ट केले आहे. हे कोण आहे, मला त्याला उत्तर द्यायचे आहे. भाऊ मला पत्नी नाही, मी भारतात राहतो, वयाच्या 9 व्या वर्षापासूनच गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहत आहे. तसेेच, मी कोठे राहतो हे सर्व जगाला माहित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.