अमीर सोबत खरच रिलेशनशिप मध्ये आहे ब्राह्मण कुटुंबातील फातिमा?यामुळेच घेतला आमिरने घटस्पोट??

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने अलीकडेच आपली दुसरी पत्नी किरण रावपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांच्या घटस्फोटाने सर्वांनाच चकित केले आहे. दोघांचे जवळजवळ 15 वर्षापूर्वी लग्न झाले होते. आमिर खान आणि किरण राव यांनी आपल्या विभक्ततेची घोषणा करत निवेदन जारी केले आहे.

आमिर आणि किरणच्या विभक्ततेबद्दल सोशल मीडिया वापरकर्ते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, अभिनेत्री फातिमा सना शेख खूप ट्रेंड करीत आहे. घटस्फोटाचे कारण सांगण्यासाठी वापरकर्ते फातिमाला ट्रोल करत आहेत. मात्र, फातिमाच्या ट्रेंडनंतर चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घ्यायचे आहे.

फातिमाचा जन्म हैदराबाद (तेलंगणा) येथे झाला आहे. ती मुंबईत मोठी झाला. फातिमाचे वडील विपिन शर्मा जम्मू येथील ब्राह्मण कुटुंबातील आहेत, तर तिची आई तबस्सुम श्रीनगरमधील मुस्लिम कुटुंबातील आहेत. फातिमाच्या घरात इस्लामचा विचार केला जातो आणि म्हणूनच फातिमा सना शेख असे या अभिनेत्रीचे नाव आहे. फातिमाने बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती.

आंटी 420″, वन 2 के 4, बडे दिलवाला या चित्रपटात ती बाल कलाकार म्हणून दिसली आहे. फातिमाची ओळख आमिर खानच्या ‘दंगल’ या चित्रपटाने झाली होती. या चित्रपटानंतर तिला ‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखले जाऊ लागले. या चित्रपटात फातिमा सना शेख आणि सोना महापात्रा आमिर खानच्या मुली म्हणून दिसल्या होत्या.

दंगलनंतर फातिमा आमिर खानसमवेत ठग्स ऑफ हिंदोस्तानमध्ये दिसली होती. आमिर आणि फातिमाच्या अफेअरच्या बातम्या त्या वेळी खूप चर्चेत होत्या. आमिरने यावर प्रतिक्रिया दिली नसली तरी फातिमा ने या बातम्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. फातिमा ने एका मुलाखतीत सांगितले होते की, “आधी मी याबद्दल फारच अस्वस्थ होते, पण आता मला वाईट वाटत नाही. ही बातमी वाचणार्‍या लोकांना असे वाटते की मी एक चांगली व्यक्ती नाहीये परंतु आता या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला मी शिकले आहे.

चित्रपटात येण्यापूर्वी फातिमाने टीव्हीमध्येही काम केले आहे. तिने बेस्ट ऑफ लक , लेडीज स्पेशल आणि नेक्स्ट जनम मोहे बिटिया हा किजो मध्ये काम केले आहे. हैदराबादमध्ये 11 जानेवारी 1999 रोजी जन्मलेल्या फातिमा नेे बॉलिवूडमधील अनेक चित्रपट केले आहेत, ज्यात शाहरुख खान-जुही चावला अभिनीत “वन टू का फोर”, “बिट्टू बॉस”, “आकाशवाणी”, “लुडो” आणि “सूरज पे मंगल” हे सामील आहेत .फातिमा सना शेख एक अभिनेत्री तसेच एक चांगली नर्तक आहे, ती एक छायाचित्रकार ही आहे. तीने एका स्टुडिओमध्ये छायाचित्रकार म्हणूनही काम केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.