अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा नवरा राज कुंद्रा हे काही ना काही कारणास्तव बर्याचदा चर्चेत असतात. दोघांची जोडीही बरीच लोकप्रिय आहे. राज एक मोठा उद्योगपती आहे. बुर्ज खलिफा येथील एका अपार्टमेंटपर्यंत 20 कॅरेटच्या रिंगपासून ते राज ने शिल्पाला अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत.
सोमवारी रात्री अश्लील चित्रपट बनवून ॲपवर टाकल्याबद्दल राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. तो मंगळवारी न्यायालयात हजर होणार आहे. शिल्पा शेट्टी बर्याचदा आपल्या डायमंड रिंग फ्लोट करताना दिसली आहे. शिल्पाला एंगेजमेंटमद्ये राज कुंद्राने 20 कॅरेटची रिंग घातली होती, जीची किंमत सुमारे तीन कोटी आहे.
शिल्पा शेट्टीला राज ने एनिवरर्सरी निम्मित सर्वात महागडी भेटवस्तू दिली होती. राजने आपली पत्नी शिल्पाला दुबईतील बुर्ज खलिफामद्ये 19 वा अपार्टमेंट गिफ्ट केला होता. राज कुंद्राने पत्नी शिल्पा शेट्टीसाठी आणखी एक महागडी प्रॉपर्टी विकत घेतली होती. त्याने यूकेमध्ये ‘राज महल’ नावाचा एक आलिशान 7 बेडरूमचा वीला विकत घेतला होता.
शिल्पाचे एक स्वप्न होते की तिला मुंबईत सी फेसिंग वीला पाहिजे आणि तिचे हे स्वप्न तिचा पती राज कुंद्रा पूर्ण केले. त्यांच्या सी फेसिंग वीला चे नाव ‘किनारा’ आहे. राज कुंद्राने शिल्पा शेट्टीला अनेक लक्झरी कारही गिफ्ट केल्या आहेत. यात बीएमडब्ल्यू झेड 4 चा समावेश आहे. वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर राज आणि शिल्पा हे दोन मुलांचे पालक आहेत.