अश्लील विडिओ बनवल्या प्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्रा ची व्हाट्सएप चॅट झाली व्हायरल!!!

प्रसिद्ध उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी चा पती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अश्लील व्हिडीओ बनवून प्रदर्शित करणे या गुन्ह्यांतर्गत राजला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात आणखी काही माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यात राजच्या व्हॉट्सअप चॅटचा देखील समावेश आहे. या चॅटमध्ये राज हॉटशॉट डिजिटल अॅप्लिकेशनच्या कमाईबद्दल बोलले गेले. तर या चॅटमधून राज त्याच्या व्यवसायातून दिवसाला लाखो रुपयांची कमाई करत असल्याचं सत्य उघडकीस आलं आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, राज आणि त्याचे मित्र प्रदीप बक्शी यांचे व्हॉट्सअप चॅट पोलिसांच्या हाती लागले आहेत. राजने त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता ज्याचा अॅडमीन तोच होता. राजसोबत ग्रुपमध्ये आणखी चार व्यक्तींचा समावेश होता. मेघा वियान अकाउंट्स, प्रदीप बक्शी, रॉब डिजिटल मार्केटिंग हॉटशॉट्स आणि रॉय इवांस कन्टेंट हेड हॉटशाट्स अशी त्यांची नावं असून ग्रुपमधील ऑक्टोबर २०२० मधील चॅट पोलिसांच्या हाती लागलं आहे. या चॅटमधून उघड होतं की राज अॅपवरील लाइव्ह शो मधून दररोज १ लाख ८५ हजार रुपयांची कमाई करत होता. तर अॅपवर उपलब्ध असलेल्या व्हिडिओमधून दररोज चार लाख ५३ हजार रुपयांची कमाई होत होती.

या अॅपवर ऑक्टोबर २०२० पर्यंत २० लाखाहून अधिक सबस्क्रायबर होते. सोबतच राज प्रदीपला कलाकारांना लवकरात लवकर पैसे देण्याबद्दलही सांगत आहे. राजने प्रदीपला म्हटलं आहे की, त्याची एक कलाकार प्रिया सेनगुप्ता हिला पैसे मिळाले नसून लवकरात लवकर ते देण्यात यावे.

१० ऑक्टोबरला झालेल्या या चॅटमध्ये ८१ व्यक्तींना वेळेवर पैसे मिळाले नसल्याचा खुलासा देखील झाला होता. राजचे हे चॅट पाहून प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला आहे. राजवर आता काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहीलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.