प्रियंका चोप्रा 39 वर्षांची झाली आहे. 18 जुलै, 1982 रोजी जमशेदपूर येथे जन्मलेल्या प्रियांकाने आपल्या करिअरची सुरूवात 2002 मध्ये ‘तमिझन’ तमिळ या चित्रपटातून केली होती. तथापि, 2003 मध्ये आलेल्या ‘अंदाज’ या चित्रपटाद्वारे तीला ओळख मिळाली, तथापि, 2018 मध्ये तिने अमेरिकन गायक निक जोनासशी लग्न केले. तसेच, निक जोनासपूर्वी प्रियांका बर्याच लोकांशी अफेयरमुळे चर्चेत राहिली आहे.
प्रियंका चोप्राचे पहिले प्रेम असीम मर्चंट हा होता. चित्रपटांमध्ये दिसण्यापूर्वी प्रियांका त्याला डेट करत होती. पण प्रियंकाला बॉलिवूडमध्ये यश मिळताच तिने आपले पहिले प्रेम म्हणजेच असीम मर्चंटला विसरली. असीमनेही प्रियांकाच्या जीवनातील घटनांवर ’67 Day’s ‘नावाचा चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. मात्र, नंतर प्रियांकाने कोर्टाच्या मदतीने हे थांबविले. 2008 मध्ये प्रियंका चोप्राचा प्रियकर असीम मर्चंट आणि सेक्रेटरी प्रकाश जाजू यांच्यात भांडण झाले होते.
‘अंदाज’ या चित्रपटात अक्षय कुमार सोबत रोमँटिक गाण्यात दिसलेल्या प्रियंका चोप्राने त्याच्याबरोबर अनेक सुपरहिट चित्रपट केले. अक्षय कुमारसोबत प्रियंकाची जोडी लोकांना खूपच आवडली होती. मीडिया रिपोर्टनुसार, हे दोघे काम करताना एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. अशा बातम्याही आल्या आहेत की, प्रियंकामुळे अक्षयची पत्नी ट्विंकलने तिच्या नवर्यापासून घटस्फोट घेण्याचा विचार केला होता.
अक्षय कुमारशी ब्रेकअप झाल्यानंतर प्रियंकाने दिग्दर्शक हॅरी बावेजाचा मुलगा हरमन बावेजाला डेट करण्यास सुरुवात केली. दोघांनीही लव स्टोरी 2050 मध्ये एकत्र काम केले होते. तसेच, प्रियांकाने शाहरुख खानसोबत डॉनमध्ये काम केले. यानंतर दोघांनीही ‘डॉन 2’ मध्ये काम केल्यानंतर त्यांच्या अफेअरची चर्चा वाढू लागली. अगदी शाहरुखच्या घरीही बातमी पोहोचली.
त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी यांच्यात वाद निर्माण होण्याच्या बातम्या येऊ लागल्या. प्रियांकामुळे गौरीला तिचा नवरा शाहरुखवर खूप राग आला होता, त्यानंतर शाहरुखने गौरीला कसं तरी समजावून सांगितलं. कामिने’ चित्रपटाच्या दरम्यान प्रियंका आणि शाहिद कपूर एकमेकांच्या अगदी जवळ आले होते. माध्यमांच्या वृत्तानुसार या दोघांनी गोव्यातील एका खासगी पार्टीत सगाई ही केली होती. मात्र, नंतर दोघांचेही अचानक ब्रेकअप झाले.
निक जोनास प्रियंका चोप्राचा पहिला परदेशी प्रियकर नाहीये. त्याच्या अगोदर गेरार्ड बटलर प्रियंकाचा प्रियकर होता. गेरार्ड 2009 मध्ये भारतात आला होता आणि प्रियांकाने त्याच्यासाठी एक पार्टी आयोजित केली होती. असे म्हटले जाते की जेरार्ड बटलरने प्रियांकाला त्या पार्टीत प्रपोजही केले होते.