चित्रपट कलाकार सहसा त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी काहीही करून जातात. बॉलिवूड कलाकार आपले प्रेम मिळवण्यासाठी जात, धर्म इत्यादींकडेदेखील पाहत नाहीत असे बर्याचदा पाहिले जाते. हिंदी चित्रपटसृष्टीत बर्याच हिंदू अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी एका मुस्लिम पुरुषांशी लग्न केले, पण त्यांचे संबंध फार काळ टिकले नाहीत.
हनी इराणी …
हनी इराणी वयाच्या अवघ्या 17 वर्षांची असताना ति हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर याच्या प्रेमात पडली होती. या दोघांची चित्रपटाच्या सेटवर प्रेमकथा सुरू झाली होती. जावेद हनीपेक्षा 10 वर्ष मोठा असूनही दोघांनी लग्न केले होते. तथापि, नंतर जावेदचे हृदय अभिनेत्री शबाना आझमीवर आले आणि जावेद अख्तरने हनी इराणीशी घटस्फोट घेतला आणि शबाना आझमीबरोबर आपले घर बसवले.
मलायका अरोरा…
मलायका अरोराने काही वर्षे डेटिंगनंतर अभिनेता अरबाज खानशी लग्न केले होते. दोघांनी 1998 साली लग्न केले होते, परंतु 19 वर्षानंतर त्यांचे संबंध वर्ष 2017 मध्ये संपले. मलायकाने अरबाजपासून घटस्फोट घेतला होता. यादरम्यान अभिनेता अर्जुन कपूर मलायका अरोराच्या आयुष्यात दाखल झाला आणि दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांच्या प्रेमात कैद झाले आहेत.
संगीता बिजलानी…
संगीता बिजलानी ही 80 आणि 90 च्या दशकाची एक सुंदर अभिनेत्री आहे. संगीता 61 वर्षांची आहे, तसेच ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत राहिली आहे. सुरुवातीला तिचे प्रसिद्ध अभिनेता सलमान खानशी जवळपास 10 वर्षे अफेयर होते आणि त्या दोघांच्या लग्नाची कार्डसही छापली होती, पण लग्न होऊ शकले नाही.
यानंतर, संगीता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याच्या प्रेमात पडली आणि मोहम्मदनेही संगीताला आपले हृदय दिले. विवहित असलेल्या मोहम्मदने आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि त्यानंतर त्याने 1996 मध्ये संगीताशी लग्न केले. पण 10 वर्षानंतर दोघांचे 2010 साली घटस्फोट झाले.
मोनिका बेदी…
अभिनेत्री मोनिका बेदी अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिचे एकदा अंडरवर्ल्डशी संबंध होते. एक काळ असा होता की मोनिका अंडरवर्ल्ड डॉन अबू सलेमच्या अगदी जवळ होती. असे म्हटले जाते की दोघे जवळपास आठ वर्ष रिलेशनशिप मध्ये होते आणि दोघांनीही लग्न केले होते.
तसेच बनावट पासपोर्ट प्रकरणात मोनिका बेदीचे नाव समोर आले होते आणि त्यानंतर तिला तुरूंगातही जावे लागले. यावेळी ती अबूबरोबर होती आणि सन 2007 मध्ये तिला या प्रकरणात निर्दोष सोडण्यात आले.