करीना कपूर आजकाल आपल्या पुस्तकासाठी चर्चेत आहे. दोन्ही पुत्रांना जन्म दिल्यानंतर तिने गरोदरपण आणि त्यानंतरच्या समस्यांविषयी एक पुस्तक लिहिले आहे. दरम्यान, करिनाची एक जुुनी मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती तिच्या पहिल्या प्रेमाविषयी बोलली आहे. तीने मुलाखती दरम्यान खुलासा केला की तीचे पहिले प्रेम शाहीद कपूर किंवा सैफ अली खान नव्हते.
तर वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षीच ति एका अभिनेत्याच्या प्रेमात पडल्याचे तीने सांगितले आहे आणि हेच तीचे पहिले खरे प्रेम आहे. करीना कपूरने सांगितले आहे की- अभिनेता विक्की निहलानी हे तिचे पहिले प्रेम आहे. मी आणि विक्की सोलमट होते. तो नेहमी माझ्याबरोबर होता. तोच माझे पहिले प्रेम आहे. मी 13 वर्षांंची होते तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडले होते.
मुलाखतीदरम्यान करीना कपूरला जेव्हा विचारले गेले की तिने भविष्यासाठी काही प्लॅन तयार केला आहे का, तेव्हा ती म्हणाली की लग्नाबद्दल आणि सर्व गोष्टींबद्दल विचार करणे मला फार महत्त्वाचे वाटत नसे. माध्यमांच्या वृत्तानुसार त्यावेळची वर्तमानपत्रे आणि मासिकेची एकच हेडलाईन होती की कपूर कुटुंबातील मुलगी पहलज निहलानीच्या मुलाच्या प्रेमात वेडी झाली आहे.
तथापि, काही काळानंतर दोघे वेगळे झाले आणि ब्रेकअपनंतर करिना कपूरने पुन्हा माध्यमांशी बोलताना सांगितले की आता तिला फक्त चित्रपट आवडतात आणि पुढील 10 वर्षे चित्रपट करणार आहेत. करीनाने 2000 मध्ये रिफ्यूजी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. हा चित्रपट फ्लॉप ठरला, पण करीनाच्या कारकीर्दीला सुरुवात झाली.
करीना-शाहिद एकमेकांच्या रिलेशनशिपमध्ये आले आणि दोघांनीही हे मान्य केले. पण जब वी मेटच्या शुटिंगच्या शेवटी दोघांमधील तणाव वाढला आणि अखेर त्यांचा ब्रेकअप झाला. यानंतर सैफ अली खानने करीनाच्या आयुष्यात प्रवेश केला. टशन या चित्रपटाच्या सेटवर करीना व सैफ अली खान एकमेकांना भेटले होते. दोघांनीही एकमेकांना बरीच वर्ष डेट केेले, दोघेही लिव्ह-इनमध्ये होते आणि दोघांनी 2012 मध्ये लग्न केले. दोघांनाही 2 मुलेे आहेत.
करीनाने तिच्या कारकीर्दीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने मुझे कुछ कहना है, अजनबी, कभी खुशी कभी गम, ऐतराज, हसल, चूप चुपके, ओंकार, जब वी मेट, गोलमाल रिटर्न्स, 3 इडियट्स, बॉडीगार्ड, बजरंगी भाईजान, उडता पंजाब, वीर दी वेडिंग या चित्रपटांमध्ये काम केले.
वर्क फ्रंटबद्दल बोलताना तीचा आगामी चित्रपट लालसिंग चड्ढा आहे. या चित्रपटात ती आमिर खानच्या सोबत दिसणार आहे. याशिवाय करीना देखील एका चित्रपटात सीतेची भूमिका साकारणार होती, त्यासाठी तिने 15 कोटी रुपये फी मागितली होती.