दिव्या भारतीने अगदी लहान वयात बरेच यश आणि लोकप्रियता मिळविली. आजही बरेच लोक असे म्हणतात की, दिव्या भारती ही बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री होती. दिव्य भारती ने जे स्थान मिळवलेे होते, ते प्रत्येकजण मिळवू शकत नाही. दिव्या भारतीने अगदी लहान वयातच जग सोडले. दिव्या भारतीचे निधन हे एक रहस्यच राहिले.
दिव्या भारती ने वयाच्या 14 व्या वर्षी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. एका वर्षातच तीने बरीच प्रसिद्धी मिळवली होती. दिव्या भारतीने तिच्या छोट्याशा कारकीर्दीत 12 चित्रपटांत काम केले. दिव्या भारती अगदी लहान वयात खूपच सुंदर दिसत होती आणि ती खूप प्रसिद्ध झाली होती. तीने दीवाना, बलवान, दिल आशा है, दिल ही तो है यासारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
दिव्या भारती 16 वर्षांची होती तेव्हा ती साजिद नाडियाडवालाला भेटली होती. फिल्म सिटीमध्ये शोला आणि शबनम चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांची भेट झाली होती. यानंतर साजिदने 15 जानेवारी 1992 रोजी दिव्या भारतीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दिव्या भारती आणि साजिद नाडियाडवाला यांनी 20 मे 1992 रोजी लग्न केले होते.
दिव्या भारती ने तिच्या मृ’त्यू’च्या काही तास आधी मुंबईत नवीन 4BHK फ्लॅट घेतला होता. तीने ही बातमी आपला भाऊ कुणाललाही दिली होती. त्याच दिवशी दिव्या भारती शूटिंगनंतर चेन्नईला परतली.
तीच्या पायाला दुखापत झाल्या मुळेे दिव्या भारती रात्री दहा वाजता मुंबईच्या पश्चिम अंधेरी येथील वर्सोवा येथील आपल्या अपार्टमेंटमध्ये नीता लुल्ला आणि तिच्या पतीसमवेत होती. तिघेही खूप एन्जॉय घेत होते. पण काही मिनिटांनंतर दिव्या भारती अचानक खोलीच्या खिडकीतून खाली पडली. दिव्या भारतीच्या खिडकीत ग्रील बसवलेलं नव्हतं.