वयाच्या 57 व्या वर्षी सनी देओल च्या या कृत्यामुळे उडाली खळबळ!! आपल्यापेक्षा 38 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीबरोबर….

हिंदी चित्रपटातील अभिनेत्रींपेक्षा अभिनेत्यांची करिअर खूप लाँग असते. वयानंतर अभिनेत्री अभिनयापासून दूर जातात किंवा त्यांना मुख्य अभिनेत्रीची भूमिकाही मिळत नाही, तर अभिनेते त्यांच्यापेक्षा कित्येक वर्षांपेक्षा कमी वयाच्या अभिनेत्रींबरोबरही प्रणय रोमान्स करतात. ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेता सनी देओलचेही नाव या यादीमध्ये समाविष्ट आहे.

सनी देओल हा बॉलिवूडचा एक ज्येष्ठ अभिनेता आहे. 80 आणि 90 च्या दशकात त्याने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेता म्हणून सनी देओल 38 वर्षांपासून बॉलिवूडशी संबंधित आहे. 1983 मध्ये त्याचा पहिला चित्रपट आला होता, ज्याचे ‘बेताब’ असे नाव होते आणि तो हिट ठरला होता. या चित्रपटातील त्याची नायिका अमृता सिंग होती.

सनी देओलने आपल्या दीर्घ कारकीर्दीत एक्शन अवतारसह बराच आवाज केला. सनी देओलने त्याच्या काळातील जवळपास प्रत्येक अभिनेत्रीबरोबर काम केले आहे. पण खळबळ त्या वेळी निर्माण झाली होती, जेव्हा सनी देओलने आपल्यापेक्षा 38 वर्षांने कमी वयाच्या अभिनेत्रीसह मोठ्या पडद्यावर रोमान्स केला होता.

आम्ही अभिनेत्री उर्वशी रौतेलाबद्दल बोलत आहोत. उर्वशी आणि सनी देओल यांनी ‘सिंह साब द ग्रेट’ नावाच्या एका चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट 2013 साली रिलीज झाला होता. यामध्ये दोन्ही कलाकार मुख्य भूमिकेत होते. खास गोष्ट म्हणजे सनी देओल या चित्रपटादरम्यान 57 वर्षांचा होता, तर उर्वशी अवघ्या 19 वर्षांची होती. दोघांमधील वयाचा फरक 38 वर्षे होता.

2013 साली आलेल्या ‘सिंह साब द ग्रेट’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्माने केले होते. या सिनेमात सनीने सरंजीत सिंगची भूमिका केली होती आणि उर्वशीने मिनीची भूमिका केली होती. त्याचवेळी प्रकाश राज आणि अमृता राव यांनीही या चित्रपटात काम केले होते. चित्रपटात सनी देओल आणि उर्वशी यांच्यात खूप बोल्ड सीन शूट केले होते.

उर्वशीसोबत बोल्ड सीन दिल्यानंतर सनी देओलने एका मुलाखतीत सांगितले होते, की उर्वशीसोबत बोल्ड सीन देताना त्याला घाम फुटला होता. 2013 मध्ये आलेल्या ‘सिंह साब द ग्रेट’ या चित्रपटात सनी आणि उर्वशीची रोमँटिक शैली पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले होते. त्याचवेळी दोन्ही कलाकारांच्या दृश्यांनी सोशल मीडियावर भरभरून प्रसिद्धी मिळवली.

Leave a Reply

Your email address will not be published.