करीना नाही तर ही हिंदू अभिनेत्री बनणार रामाची सीता,अभिनेत्री म्हणाली – आम्हाला जबाबदारीची जाणीव आहे.

हिंदी सीनेमाची उभरती अभिनेत्री, क्रिती सॅनॉन नेहमीच चर्चेत असते. ती एकामागून एक चित्रपट करत आहे. कृतीकडे चित्रपटांची कमतरता नाहीये. येत्या काळात तिचे बरेच चित्रपट रिलीज होणार आहेत, व तीच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘मीमी’ आहे. या चित्रपटाचा ट्रेलर 30 जुलै रोजी प्रदर्शित होणार असून लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल.

त्याचबरोबर अलीकडेच तीचे नाव ‘आदिपुरुष’ या चित्रपटाशी देखील जोडले गेले आहे. या चित्रपटामध्ये कृती माता सीतेची भूमिका साकारणार असल्याचे सांगण्यात येत असून अभिनेत्रीने या चित्रपटासंदर्भात मोठे विधान केले आहे. आदिपुरुष’मध्ये कृतीला माता सीतेच्या भूमिकेत पाहून तिच्या चाहत्यांसाठी खूप खास ठरणार आहे.

अलीकडेच या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल कृती सॅनॉनने एका मुलाखतीत सांगितले आहे की, ‘आदिपुरुष’मध्ये माता सीतेची भूमिका साकारण्याने तिला तिच्या जबाबदारीची जाणीव आहे. हा चित्रपट हिंदू महाकाव्य ‘रामायण’ यावर आधारित असून प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत ने याचे दिग्दर्शन करत आहे.

त्याचवेळी बाहुबली सुपरस्टार प्रभास भगवान श्री रामच्या आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान रावणच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. भूषण कुमारच्या ‘टी-सीरिज’ च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. नुकतीच अभिनेत्री कृती सॅनने ‘पीटीआय-भाषा’ या वृत्तसंस्थेशी बोलताना आदि पुरुष आणि त्यामध्ये माता सीतेच्या तिच्या भूमिकेविषयी बोलले आहे.

यादरम्यान, क्रिती म्हणाली, “निश्चितच आपल्याला एका वर्तुळातच राहावं लागेल आणि आपण ज्या पात्राची भूमिका निभावत आहोत त्याची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल. सुदैवाने, मी एका हुशार दिग्दर्शकाच्या ताब्यात आहे, यांनी या विषयावर आणि सर्व पात्रांबद्दल बरीच माहिती एकत्रित केली आहे. ”

ओम राऊतचा हा चित्रपट बर्‍याच दिवसांपासून चर्चेत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. कृती सॅनॉनने आतापर्यंत चित्रपटाच्या प्रमुख भागाचे शूटिंग पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत चित्रपटाची अनेक पोस्टर्सही रिलीज झाली असून चित्रपटाविषयी असे म्हटले जात आहे की हा चित्रपट ऑगस्ट 2022 मध्ये प्रदर्शित होईल. ‘आदिपुरुष’ हा एक मोठ्या बजेटचा चित्रपट असेल अशी बातमी आहे.

अलीकडेच कृती सॅनॉनने तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियावर चर्चा केली होती. यादरम्यान एका चाहत्याने अभिनेत्रीला तिच्या आगामी ‘मिमी’ चित्रपटाबद्दल विचारले, त्यास उत्तर म्हणून अभिनेत्री म्हणाली, “मला यावर काही बोलण्याची परवानगी नाही पण मला माहित आहे की लवकरच हा चित्रपट प्रदर्शित होईल.” मी एवढेच सांगू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published.