छोट्या पडद्याची सुप्रसिद्ध आणि सुंदर अभिनेत्री आमना शरीफचा 16 जुलै या दिवशी 39 वा वाढदिवस होता. आमना शरीफचा जन्म 16 जुलै 1982 रोजी मुंबई येथे झाला होता. तिने टीव्ही इंडस्ट्रीत तसेच बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे, पण तिला चित्रपटांमध्ये यश मिळू शकले नाही. त्याचबरोबर ती टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री आहे.
आमना शरीफ जेव्हा कॉलेजमध्ये शिकत होती, तेव्हा तिला बऱ्याच मॉडेलिंग आणि म्युझिक व्हिडिओंमध्ये काम करण्याच्या ऑफर मिळाल्या होत्या. तिच्या बॉलिवूड आणि टीव्ही डेब्यूच्या अगोदर आमनाने बर्याच म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले होते. कही तो होगा’ या मालिकेतून आमना शरीफला बरीच ओळख मिळाली. यात आमना शरीफने ‘कशिश’ नावाची व्यक्तिरेखा साकारली होती, ज्यामुळे ती प्रत्येक घरात लोकप्रिय झाली.
आमना शरीफने ‘कही तो होगा’ या मालिकेत काम केले होते आणि हा कार्यक्रम जवळ पास 5 वर्षे चालला होता. शोमध्ये काशिशची भूमिका साकारून तिने बरच यश मिळालं. या शोमध्ये तिने अभिनेता राजीव खंडेलवालच्या विरूद्ध काम केले होते. नंतर तिने होंगे जुदा ना हम, एक थी नायीका या मद्ये देखील भूमिका साकारल्या.
2013 साली आमना ‘एक थी नायिका’ नंतर छोट्या पडद्यापासून दूर गेली. 2019 मध्ये 6 वर्षानंतर तिने पूनरागमन केले. तीने ‘कसौटी जिंदगी की’ मधून पूनरागमन केलेे व, या शोमध्ये तिला ‘कोमोलिका’ ची भूमिका मिळाली. तीची एक नकारात्मक भूमिका होती जी प्रेक्षकांना फारशी पसंत नव्हती. यापूर्वी ही व्यक्तिरेखा हिना खानने साकारली होती.
आपल्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच आमना तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत राहिली आहे. तिचे नाव बऱ्याच लोकांशी संबंधित होते. ‘कभी तो होगा’ शोमध्ये काम करत असताना तीचा सहलाकार राजीव खंडेलवालसोबत अफेयर होते. दोघांनी जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केलं होते. यासह तीचे नाव टीव्ही कलाकार विकास सेठी, इक्बाल खान आणि शब्बीर अहलुवालिया यांच्याशीही जोडले गेले होते.
तर तिचे बॉलीवूड अभिनेता आफताब शिवदासानीशीही संबंध होते. पण अखेर तिने वितरक आणि निर्माता अमित कपूर याच्याशी लग्न केले. दोघांनी जवळपास एक वर्ष एकमेकांना डेट केलं होते आणि 27 डिसेंबर 2013 रोजी या जोडप्याने गाठ बांधली. आपल्या प्रेमापोटी आमना शरीफने आपला धर्म सोडला. तिने इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केला आणि कायमची अमित कपूूरची झाली.