बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तने तीन लग्ने केली आहेत. 1987 मध्ये त्याने पहिले लग्न केले आणि या लग्नामुळे त्याची मुलगी त्रिशाला झाली. त्रिशालाच्या जन्मानंतर काही वर्षानंतरच ऋचा शर्मा चे निधन झाले.
यानंतर संजय दत्तचे रिया पिल्लईसोबत लग्न केलं पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही आणि लवकरच त्यांचा घटस्फोट झाला. रियापासून घट’स्फो’टानंतर संजयने 2000 सालि मान्यताबरोबर लग्न केले.
संजयची मोठी मुलगी त्रिशाला सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते आणि बर्याचदा तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित रहस्येही उघड करत असते. दरम्यान, तिने आपल्या जीवनाशी संबंधित आणखी एक मोठे रहस्य उघड केले आहे. जे ऐकून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
खरं तर, त्रिशला दत्तने अलीकडेच तिच्या आयुष्याशी संबंधित एक खुलासा केला आणि ती म्हणाली की ती अत्यंत अवघड रिलेशनशिप मध्ये राहिली आहे. तिने सांगितले की जेव्हा ती रिलेशनशिपमध्ये होती, तेव्हा तिचा प्रियकर रोजचं तिच्याशी अत्यंत अन्यायकारक वागायचा. त्रिशलाने तिच्या इंस्टा अकाउंटवर एक पोस्ट शेअर करुन हा खुलासा केला आहे. हा खुलासा झाल्यानंतर त्रिशलाचे चाहते खूप दुःखी झाले आहेत.
त्रिशला दत्तने तिच्या चाहत्यांसह इंस्टाग्राम स्टोरी सेक्शन मद्ये ‘आस्क मी एनीथिंग सेशन’ हा गेम खेळला होता. यावेळी. तिने आपल्या वैयक्तिक जीवनाशी संबंधित काही कटू अनुभवांबद्दल सांगितले होते. तेव्हाच तीच् एका चाहत्याने असा प्रश्न केला की तुम्ही कधीही नात्यात चूक केली आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना त्रिशाला म्हणाली की ती काही काळापूर्वीपासूनच स्वतःला डेट करत आहे.
त्रिशला म्हणाली की तिच्या प्रियकराकडून हे नाते वाचवण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही. त्रिशलाच्या म्हणण्यानुसार तिचा जुना प्रियकर तिच्याशी बर्याच वेळा खुप वाईट पद्धतीने वागला. तो आयुष्यातील एका वाईट टप्प्यातून जात होता. मला वाटलं की कदाचित उद्या चांगला असेल पण उद्या कधीच आली नाही आणि नात्यातला दरारा वाढतच गेला.
त्रिशला दत्त येथेच थांबली नाही पण ती पुढे म्हणाली की जेव्हा माझा जुना प्रियकर माझ्यावर चुकीचे वागला तेव्हा मीसुद्धा जबाबदार होते कारण त्यावेळी मी स्वत: साठी उभी राहत नव्हते आणि असे वागण्याची परवानगी देत होते.पण आता मी माझ्या चुकातून शिकले आहे आणि मोठी झाली आहे.