नताशा स्टॅनकोविच…
नताशा स्टॅनकोविच एक टीव्ही अभिनेत्री आहे. नृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नताशाने जानेवारी 2020 मध्ये भारताचा स्टार क्रिकेटर हार्दिक पांड्याशी सगाई केली होती. त्याच वेळी, दोघांनीही जून 2020 मध्ये एका साध्या सोहळ्यात लग्न केले.लग्नानंतर एका महिन्यातच जुलै 2020 मध्ये नताशाने मुलगा अगस्त्यला जन्म दिला.
श्रीदेवी…
हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली महिला सुपरस्टार म्हणून श्रीदेवीची खास ओळख आहे. दुर्दैवाने श्रीदेवी आज आपल्यासमवेत नाहीये. 24 फेब्रुवारी 2018 रोजी दुबईमध्ये तीचे निधन झाले. आपल्या प्रत्येक अभिनयाने चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणार्या श्रीदेवीने 1996 मध्ये चित्रपट निर्माता बोनी कपूरसोबत लग्न केले. असं म्हणतात की लग्नाच्या वेळी श्रीदेवी 7 महिन्यांची गरोदर होती आणि लग्नानंतर काही आठवड्यांनी तिने मुलगी जान्हवी कपूरला जन्म दिला होता.
नेहा धुपिया…
या यादीमध्ये अभिनेत्री नेहा धुपियाचेही नाव सामील आहे. मे 2018 मध्ये नेहाने तिचा प्रियकर अंगद बेदीशी लग्न केले. असं म्हणतात की गर्भवती असल्याने नेहाचे घाईघाईने लग्न झाले होते. लग्नाच्या 6 महिन्यांतच नेहा आई झाली होती. तिने मुलगी मेहरला जन्म दिला होता.
एव्हलिन शर्मा…
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री एव्हलिन शर्मा अजून आई झाली नाहीये, परंतु लवकरच ती मुलाला जन्म देणार आहे. नुकतीच 11 जुलै रोजी अभिनेत्रीने सोशल मिडियावर आपल्या बेबी बम्पसह फोटो पोस्ट करून ती गर्भवती असल्याचे उघड केले आहे. याच वर्षी, तिने 15 मे रोजी प्रियकर तुषान भिंडीशी लग्न केले आणि आता दोन महिन्यांतच तिने स्वत: गर्भवती असल्याची माहिती दिली आहे. एव्हलिनही लग्नाआधीच गर्भवती होती.
दिया मिर्झा…
दीया मिर्झाने आज तिच्या चाहत्यांमध्ये आई बनण्याविषयी माहिती शेअर केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, यावर्षीच 14 मे रोजी अभिनेत्री आई बनली होती, परंतु तिने आता याबद्दल दोन महिन्यांनंतर सांगितले आहे. दीयाने यावर्षी 15 फेब्रुवारी रोजी वैभव रेखीशी लग्न केले होते आणि लग्नानंतर तीन महिन्यांनंतर ती आई बनली होती.