बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्झा आणि वैभव रेखीच्या घरी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. बुधवारी सकाळी दीया मिर्झाने मुलाला जन्म दिला आहे. तीने ही चांगली बातमी इन्स्टाग्रामवर आपल्या चाहत्यांना शेअर केली आहे. दियाची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
दीया मिर्झाने सोशल मीडियावर आपल्या मुलाचा हात धरलेला एक फोटो शेअर केला आहे. दीयाच्या या पोस्टवर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि तीचे चाहते कमेंट बॉक्समध्ये अभिनंदन करत आहेत. मलायका अरोरा, बिपाशा बसू, करिश्मा कपूर, करीना कपूर, अनुष्का शर्मा, रिद्धिमा कपूर साहनी यांनी दीया आणि वैभव यांचे अभिनंदन केले आहे.
तीच्या या पोस्टवर लव इमोजीचा पाऊस पडला आहे. यावर्षी 15 फेब्रुवारीला दीयाने बिझनेसमॅन आणि गुंतवणूकदार वैभव रेखीशी लग्न केले आहे. लग्नाच्या दीड महिन्यानंतर तिने आपल्या चाहत्यांना तिच्या गरोदरपणाविषयी माहिती दिली होती.