हिंदू मंदिर देव दर्शनासाठी पोहोचली सारा अली खान,लोक म्हणले-नक्की तुमचा धर्म कोणता??

अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानने अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती एक लोकप्रिय स्टार किड आहे आणि गेली तीन वर्षे फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आहे. तिच्या चित्रपटांसोबतच सारा अली खानही बहुधा चाहत्यांमध्ये तिच्या सौंदर्याबद्दल चर्चेत राहते.

सारा अली खानची सोशल मीडियावर जोरदार फॅन फॉलोइंग आहे. ती सोशल मीडियावर खूपच अ‍ॅक्टिव असते, आणि बर्‍याचदा ती तिच्या कोट्यावधी चाहत्यांसाठी काहीतरी पोस्ट करत राहते. तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे बर्‍याच वेळा सारा अली खान देखील लोकांच्या निशाण्याखाली येते आणि अलीकडेच पुन्हा पोस्टनंतर तिच्यासोबत असेच काही घडले आहे.

सारा अली खानच्या पोस्टवर भाष्य करताना काही लोक तिला तिचा धर्म विचारत आहेत, तर काही तिला हिंदू म्हणत आहेत तर काही तिला मुस्लिम म्हणत आहेत. खरं तर, अलीकडे सारा अली खान आसाममधील गुवाहाटी येथे गेली होती आणि येथे तिने जगातील प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेतले असताना, आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून याची काही छायाचित्रे शेअर केली होती.

सारा आली खाणने अलीकडेच कामाख्या देवीच्या पायाशी डोके टेकले व सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो शेअर केला होता आणि सांगितले की ती कामख्या देवीच्या मंदिरात गेली आहे. या अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तीन छायाचित्रे शेअर केली आहेत. दोन चित्रांमध्ये ती एकटी दिसली आहे आणि दुसर्‍या चित्रात तिच्याबरोबर आणखी एक महिलाही आहे.

फोटो सामायिक करताना सारा अली खानने शांतता, कृतज्ञता आणि आनंद यासारखे हॅशटॅग दिले आहेत. या दरम्यान, ती पांढर्या शलवार सूट मध्ये कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेेली होती. त्याचवेळी तिने आसामचा पारंपारिक गमछा देखील घातला होता आणि तिच्या कपाळावर टिळक दिसत आहे. ट्रोलिंग करताना एका वापरकर्त्याने लिहिलेेे आहे की, “तुझा धर्म कोणता आहे?

या व्यतिरिक्त दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले आहे की, “मॅडम, मुस्लिम का हिंदू”. त्याच वेळी, साराचे समर्थन करत तिच्या चाहत्यांनीही ट्रोलर्सला चोख प्रत्युत्तर दिले आणि एका वापरकर्त्याने लिहिले की, “एक मुस्लिम म्हणून तु देवाची उपासना करत आहेस, अद्भुत”. दुसर्‍याने लिहिले की, ‘माता राणी तुला कायम आनंदी ठेवो.

सारा अली खानने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात वर्ष 2018 मध्ये ‘केदारनाथ’ या चित्रपटापासून केली होती. यात तीचा नायक दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत हा होता. यानंतर तीने लव आज कल, सिंबा आणि कुली नंबर वन सारख्या चित्रपटांमध्ये दिसली. तीचा आगामी चित्रपट ‘अतरंगी रे’ हा आहे. ज्यामध्ये ती सुपरस्टार अक्षय कुमार आणि साऊथ स्टार धनुषसोबत दिसणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.