तारक मेहता मधील 180 किलो वजन असणारा डॉ. हाती सर्वांना हसवायचा मात्र खऱ्या आयुष्यात…..,शेवटी हसत-हसत दिला जगाला निरोप!!

सर्वांना वेड लावणार्‍या टीव्ही मालिकांमध्ये ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या प्रसिद्ध आणि अतिशय लोकप्रिय कॉमेडी शोचे नावही सामील आहे. हा शो वर्ष 2008 पासून चालू आहे. ही मालिका जुलै 2008 मध्ये सुरू झाली होती आणि तेव्हापासून ती चालूच आहे. तारक मेहता का उलटा चश्म’च्या प्रत्येक पात्राने आपल्या उत्कृष्ट कामगिरीने घरा घरात नाव कमावले आहे.

जुना डॉ. हाथी म्हणजे कवी कुमार आझादचे कार्यही लोकांना आवडले आणि त्याचा हसरा चेहरा कोणाच्याही चेहऱ्यावर हसू आणत असे, यापूर्वीच्या कार्यक्रमात कवि कुमार आझाद डॉ, हाथीच्या भूमिकेत दिसला होता, जो आता आपल्याबरोबर नाहीये. कवी आझाद कुमारचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे.

12 मे 1972 रोजी बिहारच्या सासाराममध्ये जन्मलेल्या कवि कुमार आझाद ‘तारक मेहता …’ च्या लोकप्रिय कलाकारांपैकी एक होता. 9 जुलै 2018 रोजी त्याला हृदयविकाराचा झटका आला होता आणि 46 व्या वर्षी तो जग सोडून गेला. त्याच्या मृत्यूने सर्वांनाच भावूक केले. कवि कुमारने ‘तारक मेहता’ मालिका मध्यभागी सोडली होती. कवि कुमार आझाद उर्फ डॉ. हंसराज हाथीचे कार्य सर्वांनाच आवडत असे.

तसेच कवि कुमारच्या मृत्यूला तीन वर्षे झाली आहेत पण तरीही चाहते त्याची अजूनही खूप आठवण काढतात. तो अजूनही त्याच्या चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. आता अभिनेता निर्मल सोनी ‘तारक मेहता का उलटा चश्मा’मध्ये डॉ हाथीच्या भूमिकेत आहे. तारक मेहता का उलटा चश्मा’ या टीव्ही कार्यक्रमात कवि कुमार आझादने बरीच प्रसिद्धी तसेच भरपूर संपत्तीही मिळवली होती.

तो बर्‍याच दिवसांपासून या शोचा एक भाग होता आणि निर्माते त्याला एका एपिसोडसाठी 25 हजार रुपयांची रक्कम देत असत. तो एका महिन्यात सुमारे 7 लाख रुपयांची चांगली कमाई करायचा. असं म्हणतात की, अभिनेता होण्यासाठी कवि कुमार घरातून पळून गेला होता. तसेच हिंदी चित्रपटांमध्येही त्याने काम केले आहे हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.

सन 2000 मध्ये ‘मेला’ या चित्रपटात तो दिसला होता. ज्यामध्ये आमिर खान आणि ट्विंकल खन्ना महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. त्याचबरोबर त्याने परेश रावलबरोबर ‘फंटूश’ या चित्रपटातही काम केले होते. डॉ. हाथी आपल्या वजनाविषयीही चर्चेत होता. एक असा काळ होता की, त्याचे वजन 200 किलो असायचे. शस्त्रक्रियेच्या मदतीने त्याचे वजन 80 किलो पर्यंत कमी केेले गेेले.

Leave a Reply

Your email address will not be published.