जेव्हा धर्मेंद्र सर्वांसमोर रेखाबद्दल केला खुलासा,म्हणाला- रेखा माझ्या बरोबर पण….

धर्मेंद्र त्याच्या मजेदार शैलीसाठी ओळखला जातो. त्याच्याबरोबर काम केलेल्या अभिनेत्रीसुद्धा त्याचे कौतुक करतात. अभिनेत्री जया प्रदाने द कपिल शर्मा शोमध्ये सांगितले होते की, धर्मेंद्र सेटवर सर्वाधिक फ्लट करायचा. सन 2018 मध्ये जेव्हा तो आपल्या मुलाबरोबर ‘सनी देओल, बॉबी देओलसमवेत आपल्या’ यमला पगला दिवाना फिर से ‘या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये उपस्थित होता तेव्हा त्याने तिथे रेखाची तारीफ करण्यास सुरवात केली होती.

वडिलांना रेखाची तारीफ करताना पाहून सनी देओल आणि बॉबी देओल दोघेही लाजले होते. प्रमोशन दरम्यान त्याला चित्रपटाशी संबंधित एक प्रश्न विचारला गेला होता की, ‘आम्हाला कळले आहे की चित्रपटात तुला आस पास फक्त पऱ्याच दिसतात? याचे सत्य काय आहे? ‘ उत्तर देताना धर्मेंद्र म्हणाला होता की, ‘ होश सांभाळतानाचं हे असे सुरू झाले होते… माझ्या आसपास आणि माझ्या कल्पनेतही पऱ्याच राहतात.

धर्मेंद्र ला जेव्हा सलमान खान, सोनाक्षी सिन्हा आणि रेखासोबत चित्रपटात नाचताना कसे वाटते असे विचारले असता, त्याचे उत्तर होते, माझा गेलेला काळ साक्ष आहे. मी इंडस्ट्रीत कोणालाही आवाज देतो..हे माझ्या कर्माचे फल आहे की प्रत्येकजण सामील होतो. मी एक आवाज दिला तर संपूर्ण इंडस्ट्री येते.

रेखाबद्दल बोलताना धर्मेंद्र म्हणाला, ‘हाय! हाय! हाय! रेखा ही माझी खूप जुनी मैत्रिण आहे.आम्ही एकत्र किती चित्रपट केले? देव (देव आनंद) साहब म्हणायचा की तशी ती ‘चांगली मुलगी’ आहे. रेखाची अशी स्तुती ऐकून बॉबी देओल आपला चेहरा लपवू लागला, तर सनी देओलनेही लाजिरवाना झाला होता.

धर्मेंद्रचे विवाहित जीवनही खूप रंजक राहिले आहे. त्याने प्रकाश कौरशी लग्न केले, व तीच्यापासुन त्याला चार मुले आहेत. यानंतर जेव्हा त्याने हेमा मालिनीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याचे संपूर्ण कुटुंब त्याच्या विरोधात गेले. धर्मेंद्रने कुणाचेही ऐकले नव्हते आणि हेमाशी लग्न केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published.