अब्जावधी असणाऱ्या या बॉलिवूड कलाकारांच्या बॉडिगार्डचे मानसिक वेतन ऐकून थक्क व्हाल, एखाद्या अधिकार्यापेक्षाही जास्त आहे वेतन….

बॉलिवूड सुपरस्टार जिथेही जातात तिथे त्यांच्याभोवती हजारो लाखो फॅन्स असतात. त्याच वेळी, काही चाहते इतके उत्कट असतात की त्यांना कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या आवडत्या स्टार जवळ जायचे असते. परंतु या चाहत्यांच्या गर्दीतून या स्टार चेे संवरक्षण करण्याचे काम हे बॉडीगार्ड्स करतात. बॉडीगार्ड्स सावली म्हणूनच अभिनेत्याबरोबरच राहतात.

सलमान खानचा बॉडीगार्ड शेरा गेल्या 25 वर्षांपासून त्याच्यासोबत काम करत आहे. यामुळेच सलमान खान शेराला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवतो. शेराचे खरे नाव गुरमीतसिंग जॉली आहे. शेरा आणि सलमान खानची 1998 मध्ये प्रथम भेट झाली होती, त्या दिवसापासून आजपर्यंत दोघे एकत्र आहेत. शेराला सलमान खानची छाया देखील म्हटले जाते. रिपोर्ट्सनुसार सलमान खान शेराला दरवर्षी दोन कोटी रुपये सॅलरी देतो.

शाहरुख खान – रवी सिंह
शाहरुख खान जिथे जिथे जातो तिथे त्याला चाहत्यांनी वेढलेले असते. अशा परिस्थितीत त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी फक्त एका व्यक्तीवर आहे, ज्याचे नाव रवी सिंह आहे. सावलीप्रमाणे शाहरुखच्या मागे राहणारा रवी जवळपास नऊ वर्षांपासून शाहरुखचे रक्षण करत आहे. रवी बॉलीवूडमधील सर्वात महागड्या अंगरक्षकांपैकी एक आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शाहरुख खान त्याला वर्षाकाठी 2.7 कोटी रुपये पगार देतो.

अमिताभ बच्चन – जितेंद्र शिंदे
बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चनची फॅन फॉलोइंग जगभरात आहे. बिग बीच्या सुरक्षेची जबाबदारी जितेंद्र शिंदे याच्या खांद्यावर आहे. जितेंद्र अमिताभ बच्चन याच्याबरोबर सावलीसारखे जीवन जगतो. घर, चित्रपटाचे शूटिंग सेट्स किंवा कोणताही सार्वजनिक कार्यक्रम जितेंद्र रात्र-दिवस बिग बीचे रक्षण करतो. सूत्रांच्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन त्याला वार्षिक फी 1.5 कोटी इतकी देतो.

अक्षय कुमार – श्रेयस थेले
बॉलीवूडच्या खिलाडी कुमारच्या सुरक्षेची जबाबदारी अशा एका व्यक्तीवर आहे, ज्याचे नाव श्रेयस थेले आहे. अक्षय घराबाहेर पडताच श्रेयस लगेच सतर्क होतो. अक्षय कुमार सोबत श्रेयस जवळपास प्रत्येक चित्रात दिसतो. अक्षय कुमार श्रेयसला वार्षिक 1.2 कोटी रुपयेे फीस देतो.

आमिर खान – युवराज घोरपडे
बॉलीवूडच्या मिस्टर परफेक्शनिस्ट बरोबर नेहमीच सावलीसारखा राहणारा युवराज घोरपडे बहुतेकदा चर्चेपासून दूर राहणे पसंत करतो. एका मुलाखती दरम्यान युवराजने सांगितले होते की मी नऊ वर्षांपूर्वी ऐस सिक्युरिटीत जाण्याचा निर्णय घेतला होता. युवराजच्या म्हणण्यानुसार, आज मी बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्व आमिर खानचा अंगरक्षक आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट त्याला दरवर्षी 2 कोटी फीस देतो.

Leave a Reply

Your email address will not be published.