या स्टारकिड्सचं लूक ट्रान्सफॉर्मशन पाहून तुम्ही म्हणाल,जर हे एक्टर्स होऊ शकतात, तर मग आपण का नाही?

बॉलिवूड स्टार्स जितके लाइमलाइटमध्ये राहतात, तितकीच त्यांची मुलंही लाइमलाइटमध्ये राहतात. त्यांचा जन्म होताच त्यांची चर्चा देशभर सुरू होते. आज आम्ही तुम्हाला या स्टार किड्सच्या पहिल्या आणि आजच्या लूकबद्दल सांगणार आहोत. त्यांच्या आधीच्या आणि आजच्या लूकमध्ये जमीन अस्मान फरक आहे. यामध्ये श्रीदेवीची मुलगी खुशी कपूरचेही नाव सामील आहे.

खुशी कपूर:
बोनी कपूर आणि बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणजे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी चर्चेत येण्यापूर्वी अगदी वेगळी दिसत होती. तीच्या आधीच्या आणि आजच्या लूकमध्ये खूप फरक आहे. तसेच तीचा लूक आता खूप बदलला आहे.

जान्हवी कपूर:
जान्हवी कपूर आजकाल आपल्या लूक आणि हॉट फोटोशूट्समुळे चर्चेत राहिली आहे. तीचे चित्र दररोज इंटरनेटवर व्हायरल होते. तीला लाखोंमध्ये लाईक्स आणि कमेंट्स मिळतात. पण आता सुंदर दिसत असलेली जान्हवी पूर्वी अशी दिसत नव्हती. चित्रपटांमध्ये येेण्यापूर्वी तीचा लूक खूप वेगळा दिसायचा.

सारा अली खान:
सारा अली खान आजच्या काळातील तरुणांची सर्वात आवडती अभिनेत्री आहे. ती तिच्या लूक आणि स्वीटनेसने प्रत्येकाचे मन जिंकते. पण चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी साराचे खूप वजन वाढलेले होते. पण आज ती फिट-यंग आणि सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.

इब्राहिम अली खान:
सैफ आणि अमृताचा मुलगा इब्राहिम आता खूप देखणा झाला आहे. तो चित्रपटात येण्याचा मार्गही शोधत आहे. इब्राहिम अली खानचा लूक हा काहीसा त्याचे वडील सैफ अली खानसारखा दिसतो.

आर्यन खान:
आपल्या कूल आणि डॅशिंग लुकमुळे चर्चेत असलेला शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन हा आधी खूपच एवरेज दिसत होता. पण कालांतराने त्याने त्याच्या लूकवर बरीच प्रगती केली.

सुहाना खान:
सुहाना खान बॉलिवूडच्या किंग खान शाहरुख खानची आणि गौरी खानची मुलगी आहे. प्रथम, सुहाना नेहमीच तिच्या डार्क लुकमुळे चर्चेत असायची. तीला बरेच ट्रोलही केले जायचे. परंतू आता तिचा लूक खूप आकर्षक झाला आहे.

न्यासा देवगन:
काजोल आणि अजय देवगणची लाडकी न्यासा मीडियामध्ये क्वचितच पाहायला मिळते. न्यासा देवगन पूर्वीपेक्षा आता खूपच सुंदर दिसतेे. ती सध्या सिंगापूरमध्ये राहून आपले शिक्षण पूर्ण करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.