जुळे असल्या प्रमाणे एकमेकांचे कार्बन कॉपी दिसतात हे बॉलिवूड मधील हे कलाकार भाऊ बहीण!!

बॉलिवूड स्टार्स ला आपण त्यांच्या अभिनय आणि सौंदर्यासाठी ओळखतो. यापैकी काही स्टार्स आपल्या वैयक्तिक जीवनामुळे प्रसिद्ध आहेत. यासह, त्यांच्या भवांडेही खूप चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांचे भावंडे सेम त्यांच्यासारखे दिसतात.

कॅटरिना कैफ- इसाबेल कैफ
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ तिच्या आश्चर्यकारक सौंदर्य आणि नृत्यासाठी ओळखली जाते. पण तिची बहीण इजाबेल कैफ तिच्यासारखीच दिसते. त्यांच्या चेहऱ्यात बरीच साम्यता दिसते.

भूमी पेडणेकर – समीक्षा पेडणेकर
भूमी पेडणेकर चे नाव बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट कलाकारांपैकी एक आहे. भूमीची बहीण समीक्षा तिच्यासारखीच दिसते. केवळ दोन्ही बहिणींचे स्वरुप एकसारखेच नाही तर ग्रेडियंट देखील एकसारखे आहे.

भारती सिंग – पिंकी सिंग
कॉमेडियन भारती सिंह आणि तीची बहीण पिंकी सिंग ह्या एकमेकिंच्या सेम कॉपी आहेत. पिंकी भारतीपेक्षा मोठी आहे पण दोघेही जुळे असल्याचे वाटते.

शक्ती मोहन-मुक्ति मोहन
शक्ती मोहन एक अभिनेेत्री व नर्तक आहे. मुक्ती मोहन तीची बहीन आहे. शक्ती मोहन आणि मुक्ति मोहन देखील एकमेकांच्या कार्बन प्रती असल्याचे दिसून येते. दोन्ही बहिणी इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत. शक्ती मोहन आणि मुक्ती मोहन या सर्व चार बहिणी आहेत.

अनिल कपूर – संजय कपूर
बॉलिवूडचा झक्कास एक्टर अनिल कपूर आणि त्याचा भाऊ संजय कपूर हेसुद्धा एकमेकांसारखे दिसतात. दोघांनीही बर्‍याच चित्रपटांत काम केले आहे. पण संजयला अनिलसारखे यश मिळवता आले नाही.

शिल्पा शेट्टी – शमिता शेट्टी
शिल्पा शेट्टी आणि शमिता शेट्टी देखील सख्या बहिणी आहेत. मात्र, जिथे शिल्पा शेट्टी यश मिळवले तेथे तिची बहीण शमिता शेट्टी ला असे यश मिळवता आले नाही. पण दोन्ही बहिणी दिसण्यात एकसारख्या दिसतात.

अनुपम खेर – राजू खेर
अनुपम खेर हा या इंडस्ट्रीमधील सर्वात बड्या अभिनेत्यांपैकी एक आहे. पडद्यावर दमदार भूमिका करून आपली ओळख निर्माण करणार्‍या अनुपम खेरने लाखो लोकांना वेड लावले आहे. राजू खेरसुद्धा अनुपम खेरसारखा दिसतो.

Leave a Reply

Your email address will not be published.