काय?? करीना होणार तिसऱ्यांदा आई?अभिनेत्रीने केेला फोटो शेअर, चाहते झाले थक्क!!

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने अलीकडेच तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक चित्र शेअर केले आहे. या चित्रात बॉलिवूडची बेबो अल्ट्रासाऊंडचा एक फोटो दाखवत आहे. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या करिनाच्या या फोटोमुळे वापरकर्त्यांमध्ये बराच गोंधळ निर्माण झाला आहे. फोटो पाहून करीनाचे चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. हा फोटो सामायिक करुन अभिनेत्री काय संदेश देऊ इच्छित आहे हे लोकांना समजलेेलं नाहीये.

करिनाने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असला तरी काही लोक या पोस्टवर खूप विचित्र भाष्यही करत आहेत. करीना कपूरने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती रेड ड्रेस परिधान केलेली दिसत आहे. यासोबतच अभिनेत्री अल्ट्रासाऊंडचा फोटो कॅमेर्‍यामध्ये दाखवताना दिसत आहे. हा फोटो सामायिक करत तिने असे लिहिलेे आहे की, “काही रोमांचक गोष्टींवर काम करत आहे … पण आपण जसा विचार करत आहात हे नाहीये .. वॉच धीस स्पेस फॉर मोर…. #ComingSoon”.

करीनाच्या या पोस्टने काही सेकंदातच सोशल मीडियावर खळबळ उडाली. अर्ध्या तासात 150 लाख लोकांनी या पोस्टवर लाईकचे बटन दाबले आहे. आता या फोटोंच्या माध्यमातून तिला कोणता संदेश द्यायचा आहे हे फक्त करीना कपूरलाच माहित आहे. पण हा फोटो शेअर करून करीनाने आपल्या फॉलोअर्सच्या मनात एक क्रीयोसिटी निर्माण केली आहे..

या पोस्टमध्ये आता कोणी तिच्या गर्भावस्थेबद्दल भाष्य करीत आहे, तर कोणी असे म्हणत आहे की करीना तिच्या आगामी शोबद्दल काही इशारे देत आहे का? बर्‍याच वापरकर्त्यांनी तीच्या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये असेही लिहिले आहे की कृपया असे म्हणू नको की, आता तिसरा मुलगा येणार आहे. त्याच वेळी, काही वापरकर्ते गोंधळलेली इमोजी तयार करून आपली प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.