बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला कदाचित आता चित्रपटांपासून दूर असेल पण एक काळ असा होता की जेव्हा तिने इंडस्ट्रीवर राज्य केले होते. 80 आणि 90 च्या दशकात जुहीला इंडस्ट्रीमध्ये मोठी मागणी होती.1984 मध्ये जूहीने मिस इंडियाचे विजेतेपद जिंकले. तसेच तिने 1984 मध्ये मिस युनिव्हर्स बेस्ट कॉस्ट्यूम अवॉर्डही जिंकला होता.
जूही तिच्या व्यावसायिक जीवनापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत राहिली आहे. 1988 साली जुही ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात दिसली होती. चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला. या चित्रपटाने जूहीचे भाग्य बदलले. तसेच जूही तिच्या कारकीर्दीच्या शिखरावर होती पण अचानक तिचे लग्न झाले आणि सर्वांनाच धक्का बसला.
तिने उद्योगपती जय मेहताशी लग्न केले होते. लग्नाची बातमी ऐकताच तीचे चाहते नाराज झाले होते. या लग्नाच्या बातमीने फिल्म इंडस्ट्री मद्ये व सर्वसामान्यांना खुप नाराज केलेे होते. या लग्नाबद्दल जूहीला बरेच काही ऐकावे लागले होते. बर्याच लोकांनी तीची थट्टाही केली. लोकांनी जुहीविषयी विविध टिप्पण्या केल्या. काहींनी तिच्या नवऱ्याला म्हातारा देखील म्हटले. काही तर असे म्हटले की, तिचे लग्न पैशांसाठी झाले आहे.
जूही चावला हि जय मेहताची दुसरी पत्नी आहे. जय मेहताचे पहिले लग्न सुजाता बिर्लाशी झाले होते. 1990 मध्ये बेंगळुरूमध्ये विमान अपघातात तीचा मृत्यू झाला. या घटनेत जूहीच्या आईनेही जगाला निरोप दिला. दोघेही एकटे पडले आणि त्यादरम्यान दोघेही एकमेकांचे आधार बनले आणि त्यानंतर या दोघांमधील जवळीक वाढली आणि दोघांनी 1995 मध्ये गुपचूप लग्न केले