रवीना टंडनचा मोठा खुलासा, माझे शरीर तापिने तापत होते, आणि मला पीरियड्स येत होते पण तरीही अक्षय ने….

1 जुलै रोजी अक्षय कुमार आणि रवीना टंडन यांचा सुपरहिट फिल्म मोहराच्या रिलीजला 27 वर्षे पूर्ण झाली आहेत. राजीव राय दिग्दर्शित हा चित्रपट 1 जुलै 1994 रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलताना सुनील शेट्टी, परेश रावल, गुलशन ग्रोव्हर, रझा मुराद हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते.

हा चित्रपट त्यावेळी 3.75 कोटींच्या बजेटमध्ये बनविला गेला होता, रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने 22.65 कोटी रुपयांची बम्पर कमाई केली होती. या चित्रपटाच्या जबरदस्त यशाचा फायदा अक्षय आणि रवीनाच्या कारकीर्दीलाही झाला होता. तसेच रवीना आणि अक्षयची प्रेमकथा या चित्रपटापासून सुरू झाली होती.

रवीना टंडन आणि अक्षय कुमारचा जबरदस्त रोमँटिक सीन टीप-टिप बरसा पानी या चित्रपटामध्येही चित्रित करण्यात आला होता. त्या काळात या गाण्याला प्रचंड लोकप्रियताही मिळाली होती. हे गाणे चित्रित करण्यास 4 दिवस लागले होते. या गाण्याचे चित्रीकरण करतानाही बर्‍याच अडचणींना सामोरे जावे लागले, जे स्वतः अभिनेत्रीनेच उघड केले आहे.

रवीना टंडन ने एका मुलाखतीत सांगितले होते की टिप टिप बरसा पानी हे एका अपूर्ण इमारतीत चित्रित करण्यात आले होते. रवीना म्हणते की, “चित्रीकरण करत असताना मााझ्या पायला दगडाचे बारीक तुकडे टोचत होते. याशिवाय पावसासाठी वापरल्या जाणार्‍या टाकीचे पाणीही खूप थंड होते. या पाण्यात वारंवार भिजत राहिल्याने मलासर्दी व तीव्र ताव आली होती.

रवीना टंडन ने सांगितले की, “पाणी खूप थंड असल्यामुळं मला ताप आला होता आणि माझे शरीर तापत होते. सर्दीचा सामना करण्यासाठी मी नेहमी मध आणि आले चहा पीत असे. यासह माझे पीरियड्स देखिल चालू होते आणि मला या गाण्यात खूप मादकही दिसायचे होते. हे सर्व खूप अवघड होते. ”

Leave a Reply

Your email address will not be published.