मित्रांनो, बिग बॉस फेम आणि बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. कधी ती चाहत्यांशी तिच्या वैयक्तिक आयुष्यावर तर कधी व्यावसायिक जीवनावर बोलताना दिसते. नुकताच राखीने आई होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ती म्हणते की आता बराच काळ झाला आहे, आता तिला आई व्हायचं आहे.
माध्यमांशी बोलताना राखी म्हणाली की महिलांना त्यांच्या पीरियड्स आणि फायब्रोइड्सबाबत बरीच समस्या भेडसावतात. मग त्यांना गर्भधारणा करणे खूप कठीण होते. विशिष्ट वयानंतर आई बनणे आपल्यासाठी अवघड होते. ड्रामा क्वीन पुढे म्हणाली, हो, मला आई व्हायचं आहे. आता वेळ झाला आहे. माझे एग्ज फ्रीज झाले आहेत. माझे पती आले तर चांगले आहे, अन्यथा मला नंतर दुसरा निर्णय घ्यावा लागेल.
राखी सावंत अनेकदा पती रितेश बद्दल मीडियासमोर बोलते. तिचा नवरा कोण आहे आणि तो कसा दिसतो हे अद्याप उघड झालेले नाहीये. राखीने सांगितले होते की तिचा नवरा एनआरआय आहे. तो मीडियामध्ये आपला चेहरा दाखवत नाही, कारण तो परदेशात एका मोठ्या कंपनीत काम करतो. आपली ओळख उघड करणेे हे त्याच्या व्यवसायासाठी योग्य नाही.