आमिर खान आणि किरण राव लग्नाच्या 15 वर्षानंतर एकमेकांपासून विभक्त होत आहेत. यावर दोघांनीही दोन दिवसांपूर्वी एकत्रित घोषणा केली आहे. तेव्हापासून सर्वत्र खळबळ उडाली आहे. आमिर आणि किरणच्या घटस्फोटाच्या बातमीनंतर बर्याच लोकांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, आमिर खानच्या निर्णयानंतर अभिनेत्री कंगना रनौतने एक प्रश्न उपस्थित केला आहे.
वास्तविक कंगना रनौत सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. समकालीन प्रत्येक विषयाबद्दल ती अनेकदा खुलेपणाने आपला मुद्दा मांडत असते. आमिरच्या घटस्फोटाच्या बातमीनंतर तीने एक प्रश्न उपस्थित केला आहे. लग्न करण्यासाठी नेहमीच धर्म का बदलला पाहिजे असा सवाल कंगनाने केला आहे. मुलाला दिलेल्या वडिलाच्या नावावरही तिने एक प्रश्न निर्माण केला आहे.
कंगना रनौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरी मद्ये याबद्दल बोलले आहे. कंगनाने लिहिले आहे की, ‘एकेकाळी पंजाबमधील बहुतेक कुटुंबात एका मुलाला हिंदू बनवायचा आणि दुसर्यास शीख बनविण्याची प्रथा होती. परंतु अशी प्रथा हिंदू आणि मुस्लिम किंवा शीख आणि मुस्लिमांमध्ये दिसला नाही. आमिर खान सरांच्या घटस्फोटानंतर, मला असा प्रश्न पडला की आंतर-धार्मिक विवाहात मुले नेहमीच मुस्लिम का होतात?
कंगना पुढे लिहिते की, ‘स्त्रिया हिंदू का राहू शकत नाहीत. काळाच्या बदलाबरोबर आपणसुद्धा हे बदलले पाहिजे. ही एक जुनी आणि उलटी प्रथा आहे. हिंदू, जैन, बौद्ध, शीख, राधास्वामी आणि नास्तिक एकाच कुटुंबात एकत्र राहू शकतात तर मुस्लिम का नाही? मुसलमानांशी लग्न करण्यासाठी एखाद्याला धर्म बदलण्याची गरज का आहे? ‘
आमिर खानने जेव्हा आपली पत्नी किरण रावपासून घटस्फोटाची घोषणा केली तेव्हा खूप खळबळ उडाली होती. घटस्फोटाबाबत आमिर खान आणि किरण राव यांनी एक अधिकृत विधान सोशल मीडियावर शेअर केले गेले. या निवेदनानुसार दोघांनी परस्पर संमतीने हा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी या निवेदनात असेही म्हटले आहे की, दोघेही मुलगा आझादची एकत्र काळजी घेणार आहेत.