आपल्या मागे एव्हडी संपत्ती सोडून गेले अभिनेते दिलीप कुमार, पाकिस्तान मधील प्राचीन वाड्याचाही आहे समावेश…

बॉलिवूडचे लोकप्रिय व दिग्गज अभिनेते दिलीपकुमार आता या जगामध्ये नाहीत. ते जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांचे वडिलोपार्जित घर देखील नेहमी चर्चेत राहत होते. दिलीपकुमार यांचा जन्म पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात झाला होता, मात्र 30 व्या दशकात त्यांचे कुटुंब आपले वडिलोपार्जित घर सोडून मुंबईत येऊन स्थायिक झाले होते. दिग्गज अभिनेता जेव्हा आयुष्य जगत होते तर त्यांचे हे घर देखील त्यांच्यासारखेच चर्चेत राहत होते.

या मागील कारण हे होते की खैबर पख्तूनख्वा च्या प्रांतीय सरकारकडून दिलीपकुमार यांच्या घराला संग्रहालय बनवण्याचा निर्णय घेतला होता. सन 2018 मध्ये खैबर पख्तूनख्वा सरकारने वाटणीपूर्वी तयार असलेल्या 25 इमारती विकत घेऊन संग्रहालय बनवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये बॉलिवूडचे शोमॅन राज कपूर आणि ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांचे वडिलोपार्जित घर देखील सामील होते. पहिलेच या दोन्ही कलाकारांच्या घरांना राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले गेले आहे.

दिलीपकुमार यांचे 100 वर्षांपेक्षा जुने वडिलोपार्जित घर देखील प्रांताच्या ख्वानी बाजार क्षेत्रामध्ये स्थित आहे. सन 2014 मध्ये नवाज शरीफ यांच्या सरकारच्या काळात त्यांच्या घराला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले गेले होते. आपल्या वडिलोपार्जित घराशी दिलीपकुमार यांच्या बऱ्याच आठवणी जुळलेल्या होत्या, ज्याचा उल्लेख त्यांनी आपली आत्मकथा ‘ द सबस्टांस एंड द शो ‘ मध्ये केला होता. त्यांचे वडील मोहम्मद सरवर खान यांनी ख्वानी बाजारात शानदार घर बनवले होते. दिलीपकुमार यांचे वडील हे व्यावसायिक होते.

असे म्हणले जाते की जेव्हा सन 1988 मध्ये एकदा दिलीपकुमार भारतातून पाकिस्तानात आपल्या वडिलोपार्जित घरी पोहचले होते तर त्यांनी तिथल्या मातीला स्पर्श केला होता. आता याच वर्षी मे मध्ये खैबर पख्तूनख्वा च्या सरकारने बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते राज कपूर व दिलीपकुमार यांच्या पेशावर मध्ये असलेल्या वडिलोपार्जित घर विकत घेऊन त्यांना संग्रहालय बनवण्यासाठी 2.30 कोटी रूपये आवेदन केले आहेत. ही किंमत पुरातत्व विभागाने पेशावरच्या उपायुक्तांकडे सोपवली आहे. हा निर्णय दोन्ही इमारतींच्या उपस्थित मालकांकडे खरेदीसाठी शेवटची नोटीस पाठवल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published.