हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज ७ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. यासाठी त्यांना हिंदुजा इस्पितळात दाखल करण्यात आले होते. दिलीप कुमार यांच्यासोबत सावली सारख्या राहणाऱ्या पत्नी सायरा बानो यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्या अनेकदा चाहत्यांनाही दिलीप कुमार यांच्यासाठी सतत प्रार्थना करण्याचे आवाहन करायच्या.
दिलीप कुमार यांचं खरं नाव मोहम्मद युसूफ खान असं होतं. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी झाला होता. 1944 मध्ये आलेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली होती.
मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर आलेला ‘मिलन’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आणि त्यानंतर त्यांनी कधीचं मागे वळून पहिलं नाही. त्यांना बॉलिवूडमधील ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखलं जातं.
आज भारतीय सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार त्यांनी आपला आदर्श मानतात. अनेक कलाकारांनी तर त्यांची नक्कल करुन बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. इतका लोकप्रिय असलेला हा अभिनेत्याने वयाच्या 98 व्या वर्षापर्यंत आजाराशी लढा दिला.
वयोमानामुळं गेल्या काही काळात अनेकदा त्यांची तब्येत बिघडली होती. शिवाय दिलीप कुमार यांचे भाऊ असलम आणि एहसान खान यांचे गेल्या वर्षी करोनाच्या संक्रमणाने निधन झाले होते.