बॉलिवूड इंडस्ट्रीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांच्या बायका बॉलिवूडमध्ये काम करत नाहीत. आणि त्यांना फक्त त्यांच्या नवऱ्याच्या नावामुळे ओळखले जाते. जरी काही कलाकारांच्या बायका बॉलिवूडमध्ये काम करत नाहीत. पण चित्रपटसृष्टीपेक्षा वेगळ्या क्षेत्रात काम करून त्या बरीच ओळख कमावत आहेत. त्यातील एक म्हणजे सुनील शेट्टीची बायको आहे.
तुम्हाला माहित असेलच की सुनील शेट्टी यांच्या पत्नीचे नाव माना शेट्टी असे आहे. माना शेट्टी यांचा जन्म 22 ऑगस्ट रोजी झाला होता. नुकताच त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. सुनील शेट्टी एक चांगला अभिनेता तसेच एक मोठा उद्योगपती आहे.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सुनील शेट्टी यांची पत्नी माना शेट्टी ही एक व्यवसायिक महिला आहे. ती घरातील जबाबदाऱ्या सांभाळते आणि व्यवसायही करते. याशिवाय ती सामाजिक कार्यही करते.
सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांनी मिळून एस 2 नावाचा रिअल इस्टेट प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबईत 21 लक्झरी व्हिला बांधण्यात आले आहेत. माना शेट्टी यांचे एक लाइफस्टाइल स्टोअर आहे. या स्टोअरमध्ये आपल्याला सजावटीसाठी दररोज वापरल्या जाणार्या लक्झरी वस्तू मिळतात.
माना शेट्टी बॉलिवूडची लेडी अंबानी असल्याचे म्हटले जाते. माना शेट्टी सेव्ह द चिल्ड्रन इंडिया नावाच्या स्वयंसेवी संस्थेत सामील होऊन समाज सेवा करीत आहेत.
या स्वयंसेवी संस्थेसाठी निधी उभारणी त्या करतात. निधी गोळा करण्यासाठी त्या ‘आराईज’ या नावाने प्रदर्शन लावत असतात. जे काही पैसे गोळा केले जातात ते सर्व मुली आणि महिलांच्या गरजेसाठी वापरले जातात.