एकेकाळी ज्याचं आयुष्य हा केवळ सामान्यांसाठीच नव्हे तर मिडीयासाठीही चर्चेचा विषय होता, ज्याचं राहणीमान, पार्ट्यांमधील उठबस, क्षणात केले जाणारे करोडोंचे व्यवहार यांच्याकडे पाहून भारतीयांचे डोळे दिपून जायचे तो मल्ल्या आता मात्र जगभर तोंड लपवून फिरतोय.
मल्ल्याची छानछौकी हा जसा अनेकांच्या आवडीचा विषय होता तसाच त्याच्याभोवती मुलींचा असलेला गराडा वारंवार पाहिला गेला होता. कमी कपड्यातल्या अनेक मॉडेल्स मल्ल्याभोवती घुटमळायचा.
किंगफिशरच्या कॅलेंडर शुटमध्ये अनेकींना संधी मिळत असली तरी या नवोदित मॉडेल्सशी नावं अखेर माल्ल्यासोबत जोडली जायची. अनेकींशी तर लग्न करणार असल्याचंं माल्ल्याने अनेकदा कबूलही केलं होतं, मात्र अनेकींची स्वप्न केवळ स्वप्नंच राहिली.
तर तरुण मुली आणि माल्ल्या यांच्या नात्यांबाबत अनेक गरमागरम चर्चा रंगत असली तरी बॉलिवुडमधील एक अभिनेत्री आणि माल्ल्या यांचं नातं मात्र खास आहे.थांबा, माल्ल्याच्या कुठल्याही प्रेमप्रकरणाबद्दल विचार करत असाल तर तुमचा अपेक्षाभंग होऊ शकतो, कारण ही अभिनेत्री त्याची लाडकी लेक आहे.
आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. तुम्हाला ठाऊकही नसेल पण माल्ल्याची लेक गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करतीय. ही अभिनेत्री म्हणजे समीरा रेड्डी. समीरा ही माल्ल्याची मानसकन्या असून त्यांच्यातील ऋणानुबंध अनेकांना फारसे ठाऊक नाहीत.
रेड्डी आणि माल्ल्या यांच्यात कौटुंबिक स्नेह असल्याने लहान असल्यापासून समीरावर विजय माल्ल्याचा जीव होता. माल्ल्याचे सुपुत्र आणि समीरा यांच्यातही मैत्री असल्याने समीराला बालपणापासूनच विजय माल्ल्याने कन्या मानलं आहे.
समीरा देखील विजय माल्ल्याला काका म्हणत असून माल्ल्याच्या घरातील प्रत्येक कार्यात समीरा दिसून येते.समीराने २०१४ मध्ये उद्योगपती अक्षय वर्देसोबत लग्न केले होते. मल्ल्याने समीराच्या लग्नात वडिलांच्या सर्व भूमिका निभावल्या. एवढंच नव्हे तर रेड्डी कुटुंबाने विजय माल्ल्याला कन्यादानाची संधी दिल्याने माल्ल्याच्या हस्ते समीराचं कन्यादान करण्यात आलं होतं.
माल्ल्या फरार झाल्यापासून समीराने कधीही या नात्याची वाच्यता केली नसली तरी त्यांच्यातील या बापलेकीच्या नात्याबद्दल त्यांचे आप्तेष्ट, मित्र या सर्वांनी शिक्कामोर्तब केलं आहे. अब्जावधी रुपयांसह पोबारा केलेला माल्ल्या पुन्हा भारतात कधी येणार? त्याला शिक्षा होणार की तो कायमचा ब्रिटनमध्ये स्थिरावणार? या प्रश्नांची उत्तरम मिळवण्यासाठी भारतीयांना वाट पाहावी लागणार हेचं खरं.