ऑन स्क्रीन तरुण दिसणारे हे कलाकार वास्तविक जीवनात आहेत म्हातारे, मेकअप करून लपवतात आपले वय!!पहा वास्तविक फोटोस…

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना पडद्यावर पाहणे आणि त्यांना खर्या आयुष्यात पाहणे यात खूप फरक आहे. पडद्यावरील कलाकार त्यांच्या भूमिकेनुसार मेकअपमध्ये असतात आणि ते बऱ्या पैकी सुंदर दिसतात. मेकअपची सुंदरता अशी आहे की वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही ते पडद्यावर तरुण दिसतात.

अक्षय कुमार…
बॉलिवूडचा खेळाडू म्हणजेच अक्षय कुमारने वयाचे 53 वे वर्ष ओलांडले आहे, परंतु असे असूनही तो अजूनही मुख्य अभिनेता म्हणून कार्यरत आहे. तो अर्ध्या वयातील अभिनेत्रींसोबत पडद्यावर रोमान्स करताना दिसतो.1991 साली ‘सौगंध’ या चित्रपटाने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणारा अक्षय कुमार 30 वर्षापासून हिंदी चित्रपटसृष्टीत राज्य करत आहेत.

अजय देवगण…
गेल्या 30 वर्षांपासून अजय देवगनही हिंदी सिनेमांवर राज्य करत आहे.1991 मध्ये अजयच्या फिल्मी करिअरची सुरुवातही ‘फूल और कांटे’ या चित्रपटाने झाली होती. हा चित्रपट हिट ठरला. अजय 52 वर्षांचा आहे, परंतु तरीही तो चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून सक्रिय आहे.

रजनीकांत…
रजनीकांत दक्षिण भारतातील देवता मानला जातो आणि त्याचे चाहते त्याची पूजा करतात. रजनीकांत मुख्यत: तामिळ चित्रपटांमध्ये काम करतो, परंतू त्याने अनेक हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. चित्रपटांमधील मेकअपमुळे 70 वर्षांचा रजनीकांत आपले अर्धे वय लपवतो.

सलमान खान…
हिंदी चित्रपटसृष्टीतील एक यशस्वी अभिनेता म्हणून सलमान खानची गणना केली जाते. सलमान खान 55 वर्षांचा झाला आहे. 1989 पासून आतापर्यंत सलमान बॉलीवूडमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम करत आहे. अभिनेता म्हणून त्याचा पहिला चित्रपट होता ‘मैने प्यार किया’. मेकअपमुळे सलमान खूप हँडसम दिसतो, वयाच्या 55 व्या वर्षीही सलमान मेकअप मुळे अगदी 35 वर्षाचा वाटतो.

शाहरुख खान…
प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानचाही या यादीत समावेश आहे. 55 वर्षांचा झालेला शाहरुख खऱ्या आयुष्यात अगदी म्हाताारा दिसू लागला आहे. पण मेकअपमुळे तो पडद्यावर चांगला गोंधळ निर्माण करतो. शाहरुख खान 1992 पासून चित्रपटांमध्ये काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.