बॉलिवूडमध्ये दररोज काही ना काही नविन प्रकार समोर येत असतात. कधी कुणाचा ब्रेकअप, कधी एखाद्याचा चक्कर इ. पण या सर्वांच्या दरम्यान बॉलिवूडच्या काही कथा आहेत ज्या पूर्णपणे समोर येत नाहीत. इंडस्ट्रीमध्ये अशा काही अभिनेत्री देखील राहिल्या आहेत ज्यां लग्नाआधीच गर्भवती झाल्या होत्या.
श्रीदेवी
बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार म्हटल्या जाणाऱ्या श्रीदेवीने मीडियामध्ये लग्नापूर्वी गर्भवती असल्याची बातमी जाहीर केली होती. ‘रूप की राणी चोरों का राजा’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्यात बरीच जवळीक निर्माण झाली होती. श्रीदेवीने जेव्हा गर्भवती असल्याची बातमी दिली तेव्हा बोनी कपूरचे आधीच लग्न झालेले होते. नंतर बोनीने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि 1996 मध्ये श्रीदेवीशी लग्न केले.
नीना गुप्ता
आजच्या डेटला नीना गुप्ता हे एक मोठे नाव आहे. ती तिच्या अनोख्या आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. 80’s , जेव्हा वेस्ट इंडीयनचा क्रिकेटर विवीयन रिचर्ड कॅरेबियन संघासह भारत दौर्यावर आला तेव्हा एका कार्यक्रमादरम्यान त्याची नीनाशी भेट झाली होती. ही पहिली भेट लवकरच प्रेमामध्ये बदलली. पण विवीयनचे आधीच लग्न झाले होते. म्हणूनच विव्हियनने नीनाशी लग्न केले नाही आणि नीनाने तिची मुलगी एकटीने वाढवली.
सारिका
श्रुति हासनची आई सारिका देखील बॉलिवूडमधील नामांकित अभिनेत्रींपैकी एक होती. साऊथ स्टार कमल हासन आणि सारिका यांची एका पार्टीत भेट झाली होती. यानंतर कमलने आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला आणि सारिकाबरोबर राहण्यास सुरवात केली. या दरम्यान, सारिका गर्भवती असल्याची बाबही समोर आली आणि 1986 साली सारिकाने श्रुती हासनला जन्म दिला आणि त्यानंतर दोन वर्षांनी 1988 मध्ये या जोडप्याने लग्न केले.
महिमा चौधरी
महिमा चौधरीने शाहरुख खानबरोबर ‘परदेस’ या चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. महिमा चौधरी आता प्रसिद्धीपासून दूर आहे. सुभाष घईंशी केलेला करार मोडल्यामुळे महिमाला बऱ्याचदा कोर्टात जावं लागलं आणि कधीकधी काळ्या पैशाच्या प्रकरणात तिला कोर्टात जावं लागलं. यानंतर तिने एका खासगी समारंभात तिचा प्रियकर बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले आणि कोणालाही याबद्दल काहीही कळू दिले नाही. लग्नानंतर काही दिवसांनी तिने आपल्या गरोदरपणाची बातमी दिली. लग्नापूर्वीच ती गर्भवती झाली होती.
कोंकणा सेन शर्मा
भारतीय चित्रपटसृष्टीतल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आपली ओळख निर्माण करणार्या कोंकणा सेन शर्माने अभिनेता रणवीर शोरेशी एका खासगी सोहळ्यात लग्न केले होते. तिने लग्नानंतर काही महिन्यानंतरच, एका मुलाला, राहुलला जन्म दिला. कारण कोंकणा आधीच गर्भवती होती. आता पती-पत्नी दोघेही विभक्त झाले आहेत आणि कोंकणा एक सिंगल मदर आहे.