बी टाऊनच्या सर्वात जास्त चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक म्हणजेच, करीना कपूर आणि सैफ अली खान हे नेहमीच काहीना काही कारणामुळे प्रसिद्धीत येतात. करीना तिच्या फॅशन आणि लूकसाठी खूप प्रसिद्ध आहे. तर दुसऱ्यांदा आई झाल्यानंतरही तिने स्वत: ला प्रचंड मेन्टेन केलं आहे.त्याचबरोबर, आपल्या दुसर्या मुलाला जन्म दिल्यानंतर तिने एका वर्षापेक्षा कमी कालातच काम सुरू केले आहे.
मात्र, इतके असूनही एकदा असे समोर आले होते की, तीचा ड्रेस पाहून सैफ रागावला होता आणि त्याने कपडे बदलण्याचाही आदेश दिला होता. 2018 ची बाब आहे, करीना कपूरने तैमूरला जन्म दिल्यानंतर पुन्हा काम सुरू केले आहे. व ती वीरे दी वेडिंगला प्रोत्साहन देण्यासाठी कॅमेर्याचा सामना करत होती. पहिल्या मुलाला जन्म दिल्यानंतरही करीना कपूरने अगदी थोड्या काळातच कम बॅक केले होते.
यावेळी करीना कपूरने अतिशय सुंदर ब्लॅक कलर क्रॉप टॉप परिधान केला होता. त्याच वेळी, तिने पारदर्शक स्कर्टवर एक श्रग कॅरी केला होता. यात ती बरीच ग्लॅमरस अवतारमध्ये दिसत होती. मात्र, तिचा हा ड्रेसिंग सेन्स तिचा नवरा सैफ अली खानला आवडला नव्हता. अभिनेत्री जेव्हा तिच्या घरी पोहोचली तेव्हा सैफ तिच्यावर रागावला होता. ही बाब खुद्द करीना कपूर ने एका मुलाखतीच्या वेळी उघड केली आहे.
या मुलाखतीत बोलताना करीना म्हणाली, “माझा लूक पाहून सैफने विचारले की तु हे काय परिधान केले आहेस?” यावर मी म्हणाले की चांगल्या ड्रेसचे सर्वांकडून कौतुक झाले आहे. मग तो रागाने म्हणाला की, “तू योग्य कपडे का घालून गेली नाहीस? जा आणि ते बदल आधी. ” मात्र, त्यानंतर करिनाने सांगितले की जेव्हा तिने सैफला या कार्यक्रमाचा फोटो दर्शविला तेव्हा तो म्हणाला- हा चांगला ड्रेस आहे.