प्रसिद्धी मिळवण्यासाठी या कलाकारांनी लपवले खरे नाव, अमिताभ बच्चन सारख्या दिग्गज अभिनेत्याचे देखील आहे यादीत नाव!!

बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी आपल्या लोकप्रियतेसाठी नावेदेखील बदलली आहेत. तसेच अनुपम खेर ला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खानने आपल्या नावाशी संबंधित एक खुलासा केला आणि आपले नाव अब्दुल रहमान असल्याचे सांगितले होते. त्याच्या आजीने त्याला हे नाव दिले होते.

अजय देवगणचे नाव विशाल देवगन होते.
अजय देवगन चा जन्म 2 एप्रिल 1969 रोजी झाला होता. जन्मानंतर त्याचे नाव विशाल देवगन असे ठेवले गेले होते. त्याचे वडील अ‍ॅक्शन डायरेक्टर होते. 1991 साली अजयने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि त्यानंतरच त्याने त्याचे नाव बदलले. त्यावेळी मनोज कुमारचा मुलगा विशालही फिल्मी विश्वात आला होता. म्हणूनच गोंधळामुळे त्याने नाव बदलले आणि अजय असे ठेवले.

अमिताभ बच्चनचे नाव इनकीलाब बच्चन होते.
अमिताभची आई तेजी बच्चन स्वातंत्र्य चळवळीत सामील होती आणि त्याचा प्रभाव तीच्यावर होता, म्हणून तिने अमिताभचे नाव इंकबाल असे ठेवले होते. तेजी बच्चनचा मुलगा जन्माला आल्यावर आई वडील इंकबाल हे नाव ठेवण्यास सहमत होतेे, पण प्रसिद्ध कवी सुमित्रा नंदन पंत ने मुलाचे नाव अमिताभ ठेवले.

शिल्पा शेट्टीचे नाव अश्विनी शेट्टी होते.
जन्मानंतर शिल्पाचे नाव अश्विनी शेट्टी असे ठेवले गेले होते, त्यानंतर जेव्हा शिल्पा बॉलिवूडमध्ये आली तेव्हा तिने आई सुनंदा शेट्टीच्या सांगण्यावरून तिचे नाव बदलले. तिची आई ज्योतिषी आहे, तिने सांगितले होते की तिचे करिअर अश्विनी या नावाने चालणार नाही.

महिमा चौधरीचे नाव रितु चौधरी होते.
अभिनेत्री महिमा चौधरी चे पूर्वीचे नाव रितु चौधरी असे होते. चित्रपटांमध्ये आल्यानंतर चित्रपट निर्माता सुभाष घई ने महिमाला नवीन नाव दिले.

मल्लिका शेरावतचे नाव रीमा लांबा असे होते.
आपल्या हॉट एक्टिंग आणि स्टाईलने लोकांच्या मनावर राज्य करणारी मल्लिका शेरावतचे हे नाव खरे नाहीये. तर मल्लिकाचे खरे नाव रीमा लांबा आहे. मल्लिकाने कुटुंबाच्या इच्छेविरोधात फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. तसे, मल्लिकाचे प्रमुख सर नेेम लांबा हे होते, परंतु तिने आपल्या आईचे नाव स्वीकारले आणि शेरावत लागू केले. तर मल्लिकानेही गोंधळामुळे रीमा नाव बदलले होते.

दिलीप कुमारचे नाव मोहम्मद युसूफ खान होते.
दिलीप कुमारचे हे नावही खरे नाहीये. त्याला फिल्म इंडस्ट्रीत सर्वाधिक फिल्म फेअर अवॉर्ड्स मिळाले आहेत. दिलीप कुमारचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान होते.

मधुबालाचे खरे नाव बेगम मुमताज जहां दल्हावी होते. 1942 साली तिनेे बसंत’ या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला होता. तिने अभिनेत्री मुमताज शांतीच्या मुलीची भूमिका केली होती. तेव्हापासून तिला चित्रपटसृष्टीत बेबी मुमताज म्हटले जाऊ लागले. या चित्रपटातील अभिनेत्री मधुबालाची भूमिका पाहिल्यानंतर त्या काळातील प्रसिद्ध नायिका देविका राणीचे खूप कौतुक झाले आणि तिने मधुबालाचे नाव बेबी मुमताज असे ठेवले.

Leave a Reply

Your email address will not be published.